भाजप प्रदेशाध्यक्षांना 14 दिवसांची पोलिस कोठडी; 'हे' प्रकरण आलं अंगलट I BJP State President | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bandi Sanjay Kumar

'पोलिसांनी जबरदस्तीनं 'त्यांच्या' कार्यालयात घुसून भाजप प्रदेशाध्यक्षांना मारहाण केलीय.'

भाजप प्रदेशाध्यक्षांना 14 दिवसांची पोलिस कोठडी; 'हे' प्रकरण आलं अंगलट

करीमनगर : तेलंगणा (Telangana) भाजपचे प्रदेशाध्यक्ष (BJP State President) बी. संजय कुमार (Bandi Sanjay Kumar) यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावलीय. कोविडच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्षांना रविवारी अटक करण्यात आली. सोमवारी पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता, कोठडीत वाढ करण्यात आलीय. भाजप प्रदेशाध्यक्षांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत (Disaster management act) गुन्हा दाखल करण्यात आलाय. संजय कुमार यांच्या अटकेवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda) यांनी आक्षेप घेतलाय.

हेही वाचा: राष्ट्रीय राजकारणात 'आप'ची दमदार एन्ट्री; पंजाबात केजरीवालांची सत्ता?

भाजप प्रदेशाध्यक्षांना का अटक करण्यात आली?

कोविड नियमांचं (Covid protocols) उल्लंघन करून 'जागरण दीक्षा' सुरू केल्याच्या आरोपावरून रविवारी रात्री संजय कुमार यांना अटक करण्यात आली. राज्य सरकारनं जीओ 317 मध्ये बदल करून शिक्षक व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केलीय. ओमिक्रॉनचा (Omicron variant) झपाट्यानं प्रसार झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या कठोर आदेशानंतर, पोलिसांनी दीक्षा घेण्यास परवानगी नाकारली आणि सूचनांचं उल्लंघन करून दीक्षा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बी. संजय (Bandi Sanjay Kumar) यांना अटक केली. बी. संजय कुमार यांना रात्री मनाकोंडूर पोलीस ठाण्यात (Manakondur Police Station) हलवण्यात आलं आणि सोमवारी सकाळी येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात आणण्यात आलं.

हेही वाचा: 'महाविकास आघाडी सरकार पडेल, राणेंच्या रुपानं आणखी एक माणूस आलाय'

पोलिसांकडून कार्यालयात घुसून मारहाण

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी. संजय कुमार यांची अटक ही अत्यंत निंदनीय घटना असल्याचं म्हटलंय. राज्य सरकारनं केलेली ही लोकशाहीची हत्या असल्याचंही त्यांनी सांगितलंय. नड्डा म्हणाले, बी. संजय कुमार हे सर्व कोविड नियमांचं पालन करून त्यांच्या कार्यालयात शांततेनं आंदोलन करत आहेत. मात्र, पोलिसांनी जबरदस्तीनं त्यांच्या कार्यालयात घुसून त्यांना मारहाण केलीय, असं ते म्हणाले.

Web Title: Telangana Bjp President Bandi Sanjay Has Been Arrested By Karimnagar Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :TelanganaOmicron Variant
go to top