तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा राजीनामा

Telangana Chief Minister Chandrasekhar Rao resigns
Telangana Chief Minister Chandrasekhar Rao resigns

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्रिपद असणार आहे. 

चंद्रशेखर राव यांनी राज्य कॅबिनेटची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी तेलंगणा विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर त्यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव आणि आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल एस. एल. नरसिंहन यांच्याकडे सुपूर्द केला. राज्यपाल नरसिंहन यांनी राव यांचा प्रस्ताव स्वीकारला आहे. मात्र, त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितले.

दरम्यान, या सर्व राजकीय घडामोडीनंतर चंद्रशेखर राव हे आज दुपारी पक्षाच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधणार असल्याची माहिती तेलंगण राष्ट्र समितीच्या अधिकृत ट्विटरवर देण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com