पंतप्रधानपदाचे दिवास्वप्न पाहणाऱ्या दोन नेत्यांची भेट; नितीश-केसीआर भेटीवर भाजपची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chandrashekhar rao and cm nitish kumar

पंतप्रधानपदाचे दिवास्वप्न पाहणाऱ्या दोन नेत्यांची भेट; नितीश-केसीआर भेटीवर भाजपची टीका

पाटणा - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज पाटणा येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचे अनेक फोटोही समोर आले आहेत. ज्यामध्ये के. चंद्रशेखर राव टोपी घातलेले नितीश कुमार आणि तेजस्वी यांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहेत.

दोन्ही नेत्यांमध्ये राष्ट्रीय राजकारणावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. त्याचवेळी, दोन्ही नेते जेवणासाठी जाण्यापूर्वी काही कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विरोधात विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी राव आणि नितीश कुमार प्रयत्नशील आहेत.

बिहार दौऱ्यात केसीआर गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक चकमकीत शहीद झालेल्या बिहारच्या सैनिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत देणार आहेत.

दरम्यान भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी बुधवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीची खिल्ली उडवली. त्यांनी म्हटलं की, दोन्ही नेत्यांमधील प्रस्तावित बैठक ही “दोन दिवास्वप्न पाहणाऱ्यांची भेट” आहे. ही भेट त्या नेत्यांची होती, ज्यांनी आपापल्या राज्यात आपला पाठिंबा गमावला आहे. तरी पंतप्रधान बनण्याची इच्छा बाळगून आहे.

पत्रकारांशी बोलताना बिहारचे माजी उपमुख्यमंत्री मोदी म्हणाले, राव-नितीश कुमार यांची भेट ही दोन दिवास्वप्न पाहणाऱ्या नेत्यांची बैठक आहे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर कुठेही तग धरू शकत नाहीत. त्यांनी या बैठकीला विरोधी ऐक्याचा "कॉमेडी शो" म्हटले.

टॅग्स :BjpCM Nitish KumarKCR