राव यांची खेळी; लवकरच ‘राष्ट्रीय’ पक्षाची स्थापना

राव यांनी रविवारी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तसेच धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) प्रमुख नेते एच. डी. कुमारस्वामी यांची भेट घेतली
Telangana CM K Chandrasekhar Rao Soon the National party was formed
Telangana CM K Chandrasekhar Rao Soon the National party was formedsakal

हैदराबाद : भाजपमुक्त भारत असा संकल्प सोडलेले आणि त्यासाठी केंद्रातील सत्ताधारी भाजपविरोधी आघाडीसाठी प्रयत्नशील असलेले तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी महत्त्वपूर्ण घोषणा केली. लवकरच राष्ट्रीय पातळीवरील पक्षाची स्थापना करू, असे त्यांनी जाहीर केले. राव यांनी रविवारी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तसेच धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) प्रमुख नेते एच. डी. कुमारस्वामी यांची भेट घेतली. त्यानंतर जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार नियोजित पक्षाची ध्येयधोरणे निश्चित करण्याचे काम सुरु आहे. बुद्धिवंत, अर्थतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञांशी प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. त्यातून पर्यायी राष्ट्रीय कृतियोजना तयार करण्यावर एकमत झाले. तेलंगण चळवळ छेडण्यापूर्वी आम्ही हीच प्रक्रिया राबविली होती. त्यातून तेलंगण राष्ट्र समितीची स्थापना झाली.

रविवारी प्रगती भवन येथे राव आणि कुमारस्वामी यांनी दुपारचे भोजन घेतले. त्यांच्यामधील बैठकीत तेलंगणचा विकास, राष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिक पक्षांची भूमिका, सद्य परिस्थिती तसेच राष्ट्रीय पातळीवरील इतर राजकीय मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर राव यांची राष्ट्रीय राजकारणातील भूमिका याविषयी चर्चा झाली. कुमारस्वामी यांनी ट्विट केले की, आम्ही कर्नाटक तसेच तेलंगण या राज्यांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. राव यांच्या आदरातिथ्य आणि मैत्रीमुळे मी भारावून गेलो आहे. राव यांनी अलीकडेच पाटण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली होती. त्याआधी मे महिन्यात त्यांनी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची बंगळूरमध्ये भेट घेतली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com