Hyderabad Nanded Trains : सध्या तेलंगणा राज्यात जोरदार पावसाचा कहर सुरू असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. रस्ते जलमय झाल्याने वाहतूक ठप्प झाली असून सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.