
तेलंगणातील सर्वात मोठा पक्ष भारत राष्ट्र समिती (BRS) मधील अंतर्गत वादाला एक नवे वळण लागले आहे. पक्षप्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी त्यांची मुलगी आणि विधान परिषद सदस्य आमदार के. कविता यांना पक्षातून निलंबित केले आहे. कविता यांनी पक्ष संघटनेतील वरिष्ठ नेत्यांवर जाहीर टीका केल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.