Video : ...म्हणून गावकऱ्यांनी फेकल्या आमदारावर चपला

telangana locals hurled slippers ibrahimpatnam mla manchireddy kishan reddy video viral
telangana locals hurled slippers ibrahimpatnam mla manchireddy kishan reddy video viral

हैदराबादः तेलंगणामध्ये पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आमदाराला नागरिकांनी चपला फेकून मारल्या. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तेलंगणामध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी पूरजन्य परिस्थिती आहे. अनेकांच्या घरांची पडझड झाली असून, शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात विविध ठिकाणी 50 हून अधिक नागरिकांचा पावसामुळे मुत्यू झाला आहे. इब्राहिमपट्टनमचे आमदार मचीरेड्डी किशन रेड्डी हे  नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असताना नागरिकांनी त्यांच्यावर चपला फेकून मारल्या. शिवाय, त्यांच्या मोटारीची तोडफोड केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नागरिक चपला फेकून मारताना दिसत आहेत.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'इब्राहिमपट्टनमचे आमदार मचीरेड्डी किशन रेड्डी आणि टीआरएसचे कार्यकर्ते पुराचा फटका बसलेल्या मेडिपल्ली येथे पहाणी करण्यासाठी गेले होते. यावेळी स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. नागरिकांनी रागाच्या आमदार आणि त्याच्या समर्थकांना चपला फेकून मारल्या. शिवाय, आमदाराच्या गाडीची तोडफोड केली.' दरम्यान, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसामुळे घडलेल्या वेगवगेळ्या दुर्घटनांमध्ये 50 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रेटर हैदराबाद नगर निगम (जीएचएमसी) क्षेत्रामध्ये मृतांचा आकडा 11 पर्यंत गेला आहे. पावसामुळे पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com