नशेत 100 नंबरला केला फोन, पोलिसांना 'चिल्ड बियर' घेऊन या म्हणाला, शेवटी...|Telangana Man Drunk 100 no call demand | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Telangana Man Drunk 100 no call

नशेत 100 नंबरला केला फोन, पोलिसांना 'चिल्ड बियर' घेऊन या म्हणाला, शेवटी...

Telangana man Asked Cops To Get Him Chilled Beer: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओंना नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत (Viral Video) असल्याचे दिसुन आले आहे. नेटकऱ्यांना असे व्हिडिओ पाहणे आणि त्यावर कमेटं करणे आवडत असल्याचे दिसुन आले आहे. सध्या दक्षिण भारतातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका बहाद्दरानं 100 नंबरवर फोन करुन (Social media news) पोलिसांना बोलावून घेतलं. पोलीस आल्यावर त्यांच्याकडे चक्क चिल्ड बियरची मागणी केल्याचे दिसून आले आहे. पोलिसांना अशावेळी काय बोलावं हे कळेन. तो व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या कमेंट्सही मिळाल्या आहेत. ही चक्रावून टाकणारी घटना तेलंगाणाच्या विकराबाद जिल्ह्यातील आहे.

त्या गावातील तो एक युवक नशेत होता. त्यानं शंभर नंबरवर फोन करुन पोलिसांना बोलावून घेतलं. पोलीस जेव्हा घटनास्थळी आले तेव्हा त्याला पोलिसांनी विचारणा केली. त्यावर त्यानं पोलीस हे नेहमीच संकटात असणाऱ्यांना मदत करते. आता मला एका थंडगार बियरची गरज आहे. अशावेळी पोलिसांनी मला चिल्ड बियर आणून द्यावी. अशी विनंती त्या व्यक्तीनं केली. शेवटी पोलिसांनी त्याला आपल्या खाक्या दाखवला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढचं नव्हे तर त्याच्या आई वडिलांना देखील पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेतले.

एका इंग्रजी वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती एका पार्टीमध्ये गेला होता. रात्रीचे दीड वाजता तो नशेत होता. 22 वर्षांचा मधूनं पोलिसांना फोन केला. आणि त्यांना आपण संकंटात असल्याचे सांगितले. आम्हाला का फोन केला अशी विचारणा पोलिसांनी त्या व्यक्तीकडे जेव्हा केली तेव्हा त्यानं मी अडचणीत असून मला चिल्ड बियर हवी आहे. असं सांगितलं. एवढ्या रात्री बियरची दुकानं बंद झाल्यानं त्याला कुठेही बियर मिळणार नव्हती. त्यामुळे त्यांनी पोलिसांना फोन बियर आणण्यास सांगितले होते.

Bear news

Bear news

हेही वाचा: Photo Viral: अभिनेत्री तनुश्री दत्ताचा अपघात, पायाला मोठी दुखापत

अशी घटना काही पहिल्यांदाच घडलेली नाही. यापूर्वी देखील पोलिसांना अशाप्रकारचे फोन आले असून त्यांनी वैताग देणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. दोन महिने अगोदर एका महिलेनं 100 नंबरवर फोन करुन नलगोंडा जिल्ह्यातील एका व्यक्तिनं आपल्या पत्नीची तक्रार केली होती. बायको आपल्याला खूप त्रास देत असून ती घरात नॉनव्हेज बनवत नसल्याची तक्रार त्यानं केली होती.

Web Title: Telangana Man Drunk 100 No Call Demand Child Bear Finally Fir Lodged Against Him

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top