
Photo Viral: अभिनेत्री तनुश्री दत्ताचा अपघात, पायाला मोठी दुखापत
Bollywood News: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ताला (Bollywood Actress Tanushree Dutta) अपघात झाल्याची बातमी व्हायरल झाली आहे. त्यात तिला दुखापत झाली असून ती बातमी व्हायरल होताच चाहत्यांनी तिची विचारपुस करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांपासून तनुश्री वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आलेली सेलिब्रेटी आहे. तिनं प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर मी टू चे आरोप उडवून मोठी खळबळ उडवून दिली (Bollywood Movie) होती. त्यामुळे ती पुन्हा एकदा लाईमलाईटमध्येही आली होती. त्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत नाना पाटेकर यांनी आपली बाजु मांडली होती. आता ते प्रकरण बऱ्यापैकी शांत झाले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तनुश्री दत्ताला अपघात झाल्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता तिची प्रकृती बरी असल्याचे सांगण्यात आले आहे. तनुश्रीनं सोशल मीडियावर फोटो शेयर करुन त्यासंबंधी माहिती दिली आहे. तनुश्रीच्या पायाला दुखापत झाली आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. तिनं शेयर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, शेवटी महादेवानं दर्शन दिले आहे. रस्त्यामध्ये झालेल्या अचानक अपघातानं मी हादरुन गेले आहे. त्या फोटोंमध्ये तनुश्रीच्या पायाला दुखापत झाल्याचे दिसते आहे. चाहत्यांनी तिच्या त्या पोस्टवर कमेंट करुन तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे.
2005 मध्ये तनुश्रीनं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. प्रसिद्ध अभिनेता इमरान हाश्मीसोबत तिनं आशिक बनाया अपनेतून डेब्यु केलं. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्या चित्रपटामध्ये तनुश्रीनं बोल्ड सीन देऊन प्रेक्षकांची पसंती मिळवली होती.
Web Title: Bollywood Actress Tanushree Dutta Car Accident Break Fail Social Media Photo Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..