आंतरजातीय विवाह केल्याने पत्नीसमोर पतीची हत्या

वृत्तसंस्था
रविवार, 16 सप्टेंबर 2018

तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यात प्रेमविवाह केलेल्या एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रणय कुमार (वय 23) असे त्या मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी अमृता (वय 21) या तरुणीशी प्रेमविवाह केला होता. अमृता ही एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाची मुलगी आहे.

हैद्राबाद- तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यात प्रेमविवाह केलेल्या एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रणय कुमार (वय 23) असे त्या मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी अमृता (वय 21) या तरुणीशी प्रेमविवाह केला होता. अमृता ही एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाची मुलगी आहे.

या दोघांनी सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. या विवाहास घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे कौटुंबिक वैमनस्यातून ही हत्या झाली आहे, पोलिस अशा प्रकारचा निकष लावण्याचा प्रयत्न करत आहेत. अमृताने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिच्या वडिलांनी आणि काकांनी मिळूनच ही हत्या केली आहे, तिचा पती हा दुसऱ्या जातीतला आहे, आमच्या आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा आधीच विरोध होता. माझ्या पोटात वाढत असलेल्या बाळाचा गर्भपात करण्यास त्यांनी सांगितले होते. त्याला विरोध केल्याचा रागही त्यांचा मनात होता, या सगळ्यांचा राग मनात धरुन त्यांनी ही हत्या केली अल्याचे अमृताने पोलिसांना सांगितले आहे.

दरम्यान, अमृता गरोदर होती. प्रणय कुमार शुक्रवारी तिला घेऊन रुग्णालयात गेला होता. त्यावेळी, त्यांच्यासोबत नातलग असलेली एक महिलाही होती. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या हल्लेखोराने त्याच्या गळ्यावर कोयत्याचे दोन वार केले. यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याआधारे पोलिस हल्लेखोराचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Telangana Man Hacked To Death In Front Of Pregnant Wife Murder On CCTV