High Court च्या आदेशानंतर भाजप खासदाराची तुरुंगातून सुटका; कार्यकर्त्यांचा ठाण्याबाहेर जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bandi Sanjay Kumar

कोविड नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप नेत्याला अटक करण्यात आली होती.

High Court च्या आदेशानंतर भाजप खासदाराची तुरुंगातून सुटका

हैदराबाद : भाजपच्या तेलंगणा युनिटचे अध्यक्ष आणि खासदार बांदी संजय कुमार (MP Bandi Sanjay Kumar) यांना दोन दिवसांपूर्वी कोविड-19 प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. दरम्यान, तेलंगणा उच्च न्यायालयानं (Telangana High Court) त्यांची सुटका करण्याचे आदेश दिल्यानंतर, बुधवारी तुरुंगातून ते बाहेर पडले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी तुरुंगाबाहेर जल्लोष केला.

करीमनगर (Karimnagar) येथील तुरुंगातून सुटका झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना संजय कुमार यांनी, शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारी आदेशाविरुद्ध (GO) हा लढा सुरू ठेवणार असल्याची शपथ घेतलीय. तसेच कोणत्याही अनैतिक कारणामुळे नव्हे, तर शिक्षक आणि सरकारी कर्मचार्‍यांसाठी लढताना तुरुंगवास भोगला असल्याचंही ते म्हणाले. राज्य सरकारनं लवकरात-लवकर जीओमध्ये सुधारणा करावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.

हेही वाचा: 'लपून छपून कृत्य करण्यापेक्षा हिम्मत असेल तर पुढं या'

GO च्या विरोधातील निषेधार्थ कोविड-19 संबंधित प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रविवारी रात्री भाजप नेत्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, कुमार यांनी सत्ताधारी टीआरएसवर भ्रष्टाचाराचा आरोप करत टीका केलीय. आदल्या दिवशी, संजय कुमार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर, हायकोर्टानं सुनावणी देत त्यांना सोडण्याचे आदेश दिले. न्यायालयानं म्हटलंय की, कुमार यांनी आंदोलन करत असताना कोविड नियमांचं पालन होईल याची शाश्वती दिली पाहिजे, असं आदेशात नमूद केलंय. न्यायालयानं या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ फेब्रुवारी रोजी करण्याचे निर्देश दिलेत. दरम्यान, राज्यमंत्री भगवंत खुबा (Bhagwanth Khuba) यांनी कुमार यांच्या सुटकेनंतर लगेचच त्यांची भेट घेतली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Telangana
loading image
go to top