
पाकिस्तानी पोलिसांनी डोळ्यावर पट्टी बांधून अज्ञात ठिकाणी नेले. खांबाला बांधून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. शिवाय, अशुद्ध पाणी प्यायला देताना छळ केल्याची माहिती भारतीय उच्चायुक्तात काम करणाऱया दोन भारतीय अधिकाऱयांनी दिली.
नवी दिल्ली : पाकिस्तानी पोलिसांनी डोळ्यावर पट्टी बांधून अज्ञात ठिकाणी नेले. खांबाला बांधून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. शिवाय, अशुद्ध पाणी प्यायला देताना छळ केल्याची माहिती भारतीय उच्चायुक्तात काम करणाऱया दोन भारतीय अधिकाऱयांनी दिली.
पाकिस्तानी उच्चायुक्तात पॉल सिलवदास आणि द्विमु ब्रह्म हे दोघे भारतीय अधिकारी कार्यरत आहेत. पाकिस्तानी पोलिसांनी त्यांना 'हिट ऍण्ड रन' प्रकरणी ताब्यात घेऊन छळ केला. दोघांच्या शरीरावर जखमांचे व्रण आढळले आहेत. 15 जून रोजी दोघांना अटक केली होती. यानंतर 12 तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
धक्कादायक! पाक उच्चायुक्तामध्ये कार्यरत दोन भारतीय अधिकारी गायब
पाकिस्तानी पोलिसांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पॉल सिलवदास आणि द्विमु ब्रह्म यांनी सांगितले की, 'सुमारे 15-16 जण आणि त्यांच्या सहा मोटारींनी आम्हाला घेरले. यानंतर आमच्या डोळ्यावर पट्टी बांधून अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. एका खांबाला बांधून लोखंडी रॉडने सतत मारहाण करत होते. चौकशीदरम्यान अशुद्ध पाणी पिण्यास भाग पाडले. उच्चायुक्तात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांची वैयक्तिक माहिती विचारत होते.'
न्यूझीलंडने कोरोना मुक्तची घोषणा केली अन्...
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, 'दोघांना 'हिट अँड रन' संबंधित एका प्रकरणात पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. हे दोघेही इस्लामाबादमधील मोटार अपघातातील मुख्य आरोपी आहेत. या दोघांविरूद्ध इस्लामाबादमधील सचिवालय पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या दोघांवर असा आरोप आहे की, त्यांनी प्रथम आपल्या गाडीने फुटपाथवर चालणाऱ्या एका व्यक्तीला चिरडले आणि त्यानंतर त्यांनी घटनेपासून बचावण्याचा प्रयत्न केला. शिवाय, दोघांकडून बनावट चलनही जप्त करण्यात आले आहे.' पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 'दोघेही भारतीय उच्चायुक्तांमध्ये कार्यरत असले तरी दोघांचे डिप्लोमेटिक पासपोर्ट नाहीत.'