esakal | थरकाप उडवणारा Video: कबड्डी स्पर्धेवेळी गॅलरी कोसळली; १०० हून अधिक जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Telangana_Kabaddi

लाकूड आणि कमकुवत वस्तूंचा वापर केल्यामुळे ही गॅलरी कोसळली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

थरकाप उडवणारा Video: कबड्डी स्पर्धेवेळी गॅलरी कोसळली; १०० हून अधिक जखमी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

हैदराबाद : तेलंगणा राज्याच्या सूर्यापेट येथे कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनावेळी अचानक गॅलरी कोसळली. या दुर्घटनेत जवळपास १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांची रवानगी हैदराबाद येथील हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे. या गॅलरीमध्ये जवळपास १५०० प्रेक्षक बसले होते. 

सूर्यापेट येथे ४७व्या ज्युनियर नॅशनल कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुरवात होणार होती. त्यावेळीच ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर त्याठिकाणी गोंधळ उडाला होता. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी आणि स्वयंसेवकांनी लगेच मदतकार्याला सुरवात केली.

 "तू महाराष्ट्रात कशी फिरतेस तेच बघू"; शिवसेना खासदाराने धमकी दिल्याचा आरोप​

कबड्डी स्पर्धेचा आनंद प्रेक्षकांना घेता यावा, यासाठी तेथे तीन गॅलरी उभारण्यात आल्या होत्या. एका गॅलरीमध्ये ५००० लोक बसू शकतील, अशी बैठकव्यवस्था करण्यात आली होती. देशातील २९ राज्यांचे खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पण या दुर्घटनेनंतर स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होऊ लागला आहे. 

गांधी शांतता पुरस्कार - बांगलादेशचे बंगबंधू आणि ओमानच्या सुलतानांचा गौरव​

लाकूड आणि कमकुवत वस्तूंचा वापर केल्यामुळे ही गॅलरी कोसळली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही दुर्घटना नक्की कशामुळे झाली, याबाबत अधिक तपास करण्यात येणार आहे. दुर्घटनास्थळी आणि हॉस्पिटल या दोन्ही ठिकाणी सध्या पोलिसांचे लक्ष्य आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक भास्करन यांनी दिली. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top