Telangana Vidhansabha Election : केसीआर यांचा राज्यात प्रचार सभांचा धडका; दोन मतदारसंघातून राहणार उभे

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर तेलंगणात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
Telangana Vidhansabha Election
Telangana Vidhansabha Electionsakal

हैदराबाद - विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर तेलंगणात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी काल अदिलाबाद येथे सभा घेऊन रणधुमाळीला प्रारंभ केलेला असताना मुख्यमंत्री आणि बीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव हे राज्यात ४१ सभा घेणार आहेत. त्यांच्या सभांचा धडाका पंधरा ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

सिद्दीपेट येथील हुस्नाबादच्या सभेने चंद्रशेखर राव सभांचा नारळ फोडणार असल्याचे यापूर्वीच बीआरएसकडून जाहीर करण्यात आले होते. या सभेतच पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. काल रात्री बीआरएसने जारी केलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार राव १६ ऑक्टोबर रोजी जनगाव आणि भुवनागिरी येथील सभेला ते मार्गदर्शन करणार आहेत.

त्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी सिरसिल्ला आणि सिद्दीपेठ येथे प्रचारसभा घेतील. त्याचबरोबर १८ ऑक्टोबर रोजी जडचर्ला आणि मेदकल येथील दोन बैठकांत ते सहभागी होतील. एक आठवड्यानंतर २६ ऑक्टोबरपासून ते पुन्हा प्रचाराच्या मैदानात उतरतील आणि तीन सभा घेतील. त्यांची प्रचार मोहीम ९ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्याचदिवशी गझवेल आणि कामारेड्डी येथील दोन मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करतील.

दोन्ही मतदारसंघातून के. चंद्रशेखर राव निवडणूक लढवत आहेत. यादरम्यान, भाजपने म्हटले, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते १९ ऑक्टोबरपर्यंत राज्यात वेगवेगळ्या प्रचार मोहिमांत सहभागी होणार आहेत.

केटी रामाराव यांनी आरोप फेटाळले

आदिलाबाद येथील सभेत शहा यांनी ‘बीआरएस’वर केलेले आरोप बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामाराव यांनी फेटाळून लावले. शहा यांनी पाच वर्षांपूवी भारतीय सिमेंट महामंडळाचे पुनरुज्जीवन करण्याची हमी दिली होती. मात्र पाच वर्ष झाले तरी त्याचे पुनरुज्जीवन झालेले नाही. तेलंगणची स्थापना होऊन दहा वर्ष झाले, परंतु राज्याला एकही शैक्षणिक संस्था दिली नाही, असे ते म्हणाले.

आत्महत्येच्या बाबतीत तेलंगण आघाडीवर असल्याचा आरोप शहा यांनी केला. यावर ते म्हणाले, की शहांचे वक्तव्य भ्रामक आणि दिशाभूल करणारे आहे. अमित शहा यांनी घराणेशाहीबाबत बोलणे म्हणजे एकप्रकारची चेष्टाच आहे. बीसीसीआयच्या सचिवपदी जय शहा यांची नियुक्ती करताना ते कोठे क्रिकेटचा सामना खेळला, हे सांगावे, असा प्रश्‍नही केटी रामाराव यांनी उपस्थित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com