आंतरजातीय विवाह केल्याने आईवडिलांनीच केली मुलीची हत्या

वृत्तसंस्था
सोमवार, 24 डिसेंबर 2018

हैद्राबाद- आंतरजातीय विवाह केल्याने आई-वडिलांनीच 20 वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना तेलंगणामध्ये घडली आहे. हैदराबादपासून 250 किमी अंतरावर असणाऱ्या मंचेरिअल जिल्ह्यातील कलमाडुगू गावात हा प्रकार घडला आहे. 

हैद्राबाद- आंतरजातीय विवाह केल्याने आई-वडिलांनीच 20 वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना तेलंगणामध्ये घडली आहे. हैदराबादपासून 250 किमी अंतरावर असणाऱ्या मंचेरिअल जिल्ह्यातील कलमाडुगू गावात हा प्रकार घडला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका तरूणीने आंतरजातीय विवाह केला होता, म्हणून तिच्या आई-वडिलांनी नातेवाईकांच्या मदतीने तिची हत्या केली. इतकंच नाही तर हत्या केल्यानंतर मुलीचा मृतदेह जाळून टाकला आणि तिच्या अस्थी पाण्यात फेकून दिल्या. मुलीने कनिष्ठ जातीतील तरुणाशी लग्न केल्याने आईवडील नाराज होते. याच रागातून त्यांनी पोटच्या मुलीची हत्या केली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तरूणीचा पती लक्ष्मण याने पोलीस ठाण्यात तक्रार केली असता हा प्रकार उघडकीस आला.

लक्ष्मण आणि अनुराधा एकाच गावातील रहिवासी होते. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. अनुराधाच्या कुटुंबाचा लग्नाला विरोध असल्याने दोघेही घरातून हैदराबादला पळून गेले. लग्न करून 20 दिवसांनी लक्ष्मण आणि अनुराधा पुन्हा आपल्या गावी परत आल्याची माहिती मिळताच अनुराधाच्या कुटुंबीयांनी लक्ष्मणच्या घरावर हल्ला केला आणि जबरदस्ती अनुराधाला गावात घेऊन गेले आणि हत्या केली असे पोलिस तपासात समोर आले आहे. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह जाळला आणि अस्थी पाण्यात फेकून दिल्या असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title: Telangana Womans Body Burnt Ashes Thrown Away For Inter Caste Marriage