Television Channel : दूरचित्रवाणी वाहिन्यांनी कायदेशीर ‘प्रोग्राम कोड'चे पालन करावे; सरकारची वृत्तवाहिन्यांना तंबी

केंद्र सरकारने सर्व खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांना कायदेशीर ‘प्रोग्राम कोड'चे (कार्यक्रम नियमावली किंवा आचारसंहिता) काटेकोर पालन करण्यास सांगितले आहे.
Central Government
Central GovernmentSakal

नवी दिल्ली - केंद्र सरकारने सर्व खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांना कायदेशीर ‘प्रोग्राम कोड'चे (कार्यक्रम नियमावली किंवा आचारसंहिता) काटेकोर पालन करण्यास सांगितले आहे. अपघात, रक्त, शारीरिक हल्ल्यांशी संबंधित सोशल मिडीयावरून उचललेले चित्रीकरण आणि छायाचित्रे संपादन केल्याशिवाय ‘चालवण्याचे‘ प्रकार बंद करावेत, असा इशारा देतानाच क्रिकेटपटू ऋषभ पंत याचा कार अपघात आणि भूतकाळातील काही गुन्ह्यांचे वाहिन्यांवरील वृत्तांकन खराब व लज्जास्पद असल्याचेही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे.

मंत्रालयाने आज जारी केलेल्या नियमावलीत काही राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांच्या कामकाज पध्दतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. क्रिकेटपटूच्या कार अपघाताचे कव्हरेज, मृतदेहांची वेदनादायक छायाचित्रे प्रसारित करणे आणि पाच वर्षांच्या मुलाची मारहाण या गोष्टींचा दिशानिर्देशिकेत उल्लेख केला आहे. या घटनांचे वृत्त आक्षेपार्ह असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.

काही अपघातातील मृतदेहांचे फोटो/व्हिडिओ बातम्यांत दाखवले व आजूबाजूला रक्त सांडलेले आहे, जखमी व्यक्ती आहेत. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे क्लोज-अप शॉट्समध्ये निर्दयीपणे दाखविले गेले आहेत. वादग्रस्त व्हिडीओ संपादन न करता किंवा चेहरे अस्पष्ट न करताच कित्येक मिनिटांसाठी वारंवार दाखवले जातात, ज्यामुळे ते आणखी भयानक ठरते. काही घटनांबाबत संबंधित प्रसारणकर्त्यांनी सोशल मीडियावरून व्हिडिओ क्लिप आणि फोटो घेतले व ते जसेच्या तसे बातम्यांत दाखविले, हे अत्यंत गैर आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (नियमन) कायद्यांतर्गत नियम बनविले आहेत त्यांच्या आधीन राहूनच गुन्हेगारी, अपघात आणि हिंसाचाराच्या घटनांचे वृत्तांकन दाखविण्याचा सल्ला दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com