esakal | Telangana: प्रियांका सरड्याप्रमाणे रंग बदलतात : एन. व्ही. सुभाष
sakal

बोलून बातमी शोधा

एन. व्ही. सुभाष

प्रियांका सरड्याप्रमाणे रंग बदलतात : एन. व्ही. सुभाष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद : प्रियांका गांधी शॅमेलियन सरड्याप्रमाणे रंग बदलतात, अशा शब्दांत तेलंगणमधील भाजप नेते एन. व्ही. सुभाष यांनी टीका केली आहे.

प्रियांका यांनी नुकतीच वाराणसीतील दोन मंदिरांना भेट दिली. त्यासंदर्भात सुभाष म्हणाले की, प्रियांका यांनी हिंदू धर्माची प्रशंसा सुरु केली आहे. गांधी कुटुंबाने हिंदू कुटुंबाचा कधीही विचार केला नव्हता. प्रियांका यांनी ख्रिश्चन व्यक्तीशी विवाह केला. त्यांची आई ख्रिश्चन, तर आजोबा मुस्लीम आहेत. त्यामुळे हिंदू धर्मावर दावा करण्याचा कोणताही आधार त्यांच्याकडे नाही.

हेही वाचा: औरंगाबादेत बंधाऱ्यात कार बुडाली,एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणूकीसाठी प्रियांका राजकीय फायदा उठविण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावाही सुभाष यांनी केला. काँग्रेसची कुणाशीही युती नसल्यामुळे आपली मतपेढी गमवावी लागेल अशी भीती प्रियांका यांना वाटत आहे. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणानंतर प्रियांका यांनी कट्टर हिंदू महिलेचा नवा अवतार धारण केला आहे. शेतकऱ्यांच्या

आंदोलनातून राजकीय स्वार्थ साधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. राहुल आणि प्रियांका हे अचानकच उत्तर प्रदेशातील हिंदू मंदिरांना भेटी देऊ लागले आहेत.

loading image
go to top