काश्‍मीर खोरे गारठले

वृत्तसंस्था
सोमवार, 17 डिसेंबर 2018

श्रीनगर : श्रीनगरची शनिवारची रात्र कडाक्‍याच्या थंडीची ठरली. काश्‍मीर खोऱ्यात आणि लडाख भागात तापमानात घसरण सुरू आहे. श्रीनगरमध्ये शनिवारी रात्री तापमान उणे 5.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले. तर, शुक्रवारी हेच तापमान उणे 4.2 अंश सेल्सिअस होते. यंदाच्या हिवाळ्यात आतापर्यंत सर्वांत नीचांकी तापमान म्हणून नोंदले गेले आहे. 

शहात गुरुवारी रात्री उणे पाच अंशांपर्यंत तापमान घसरले होते. काश्‍मीर खोऱ्यातील वातावरण चिल्लई कल्हनच्या दिशेने जात आहे. 21 डिसेंबरपासून चिल्लई कल्हन सुरू होत असून, या काळात खोऱ्यातील तापमान खूपच नीचांकी पातळीवर पोचते. श्रीनगरबरोबरच काजीगुंड, कुपवाडा आणि लेह येथे शनिवारी रात्री सर्वांत कडाक्‍याची थंडी पडली होती. दक्षिण काश्‍मीरमध्ये काजीगुंड येथे किमान तापमान शून्य ते 5.6 अंश सेल्अिअसपर्यंत घसरले होते. तर, शुक्रवारी हेच तापमान शून्य ते उणे पाच अंश सेल्सिअस इतके होते. गेल्या चार वर्षांत काजीगुंड येथे सर्वांत कडाक्‍याची थंडी असणारी रात्र होती. यापूर्वी चार वर्षांपूर्वी 27 डिसेंबर 2014 रोजी किमान तापमान शून्य ते उणे 5.9 अंश सेल्सिअस नोंदले गेले होते.

कोकेरनाग शहरात किमान तापमान शून्य ते उणे 5.7 अंश सेल्सिअस नोंदले गेले. शुक्रवारी हेच तापमान शून्य ते उणे 6.6 अंश सेल्सिअस इतके होते. उत्तर काश्‍मिरातील कुपवाडा येथे शुक्रवारी रात्री तापमान उणे 4.5 अंश होते, तर शनिवारी हेच तापमान उणे सहा अंशांपर्यंत घसरले होते. गेल्या पाच वर्षांतील कुपवाडातील सर्वांत नीचांकी तापमान मानले जात आहे. लडाख येथे शनिवारी रात्री उणे 15.6 अंश सेल्सिअस तापमान राहिले. जम्मू-काश्‍मीरमध्ये शनिवारी रात्री लेह हे सर्वाधिक थंड असणारे ठिकाण ठरले. 

अन्य शहरात शनिवारचे तापमान 
कारगिल : उणे 10.8 
पहेलगाम : उणे 9.3 
गुलमर्ग : उणे 9.5 

Web Title: The Temperature of Kashmir Valley is Decreased