

Bihar Tender Fraud Case Leads to High-Profile Arrests
Esakal
बिहारमध्ये टेंडर घोटाळा प्रकरणात तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलीय. विजिलन्स डिपार्टमेंटने केलेल्या कारवाईने राज्यात खळबळ उडाली आहे. अटक केल्या अधिकाऱ्यांमध्ये बिहारच्या प्रशिसाकीय सेवेतील अधिकारी मुमुक्षु चौधरी, गृह निर्माण विभागातील माजी अभियंता तारिणी दास आणि नगर विकास विभागातील अभियंता उमेश कुमार सिंह यांचा समावेश आहे. ईडीने याआधी केलेल्या छाप्यात तारिणी दासकडे जवळपास ८.५० कोटी रोकड, मुमुक्षु चौधरीकडे २ कोटी तर उमेश कुमार सिंहकडे एक कोटी रुपये आढळले होते. याशिवाय टेंडर घोटाळ्यात अनेक प्रकरणांमध्ये यांचा सहभाग असल्याचंही तपासात समोर आलंय. Officials Held Over Alleged Bribe-for-Contract Network