
श्रीनगर : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात कमालीची उदासीनता आणि खिन्नता पसरली आहे. गुरुवारी काश्मीर खोऱ्यात सर्वत्र शांतता होती. श्रीनगर विमानतळाला संरक्षण दलांचा वेढा असून, सलग दुसऱ्या दिवशी या विमानतळावरून कोणत्याही विमानाने उड्डाण केले नाही. जम्मू, श्रीनगर, लेह विमानतळ बुधवारपासून बंद आहेत. श्रीनगर-जम्मू महामार्गही गुरुवारी बंद होता. या भागात काही ठिकाणी दरड कोसळल्याने महामार्ग बंद असल्याचे सांगण्यात आले.