esakal | ज्योतिरादित्य शिंदेंना 'गद्दार' म्हटल्यानंतर सचिन पायलटांनी दिली प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

sachin pilot and jyotiraditya shinde

भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी काँग्रेस नेते सचिन पायलट यांची ग्वालेर येथे भेट घेतली होती.

ज्योतिरादित्य शिंदेंना 'गद्दार' म्हटल्यानंतर सचिन पायलटांनी दिली प्रतिक्रिया

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

जयपूर- ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर टीका करणे सुरु केले आहे. अनेकदा काँग्रेस नेत्यांनी ज्योतिरादित्य यांचा गद्दार म्हणूनही उल्लेख केला आहे. याचा पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन पायलट यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर पायलट यांनी प्रतिक्रिया दिली. मला वाटतं प्रत्येकाला आपण कोणत्या पक्षात राहिला हवं याबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यानंतर लोक ठरवतात की त्यांचा निर्णय योग्य होता की अयोग्य, असं ते म्हणाले आहेत. 

अमेरिकेच्या स्वयंभू गुरुला 120 वर्षांची जेल; महिलांचे करायचा लैंगिक शोषण

भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी काँग्रेस नेते सचिन पायलट यांची ग्वालेर येथे भेट घेतली होती. तसेच त्यांचे मध्य प्रदेशमध्ये स्वागत असल्याचे शिंदे म्हणाले होते. पाटलट काँग्रेस नेत्यांच्या प्रचारासाठी मध्य प्रदेशमध्ये आले आहेत. ते राज्यातील ग्लालेर शिवपुरी, भिंड आणि मोरेना जिल्ह्यात प्रचार करत आहेत. 

मध्य प्रदेशात 3 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या 28 जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत. ग्वालेर-चंबळ भागात 16 जागांसाठी निवडणुका होत आहे. या भागावर शिंदे घरण्याचे वर्चस्व आहे. सत्तेमध्ये कायम राहण्यासाठी भाजपला 8 जागांची आवश्यकता आहे, तर काँग्रेस सर्व 28 जागा जिंकल्यास पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करु शकते.

मध्य प्रदेशातील स्टार प्रचारक म्हणून काँग्रेसने सचिन पायलट यांना पाठवले आहे. ज्योतिरादित्य शिंदे बंडखोरी करण्याआधी शिंदे आणि पायलट जवळचे सहकारी मानले जायचे. सचिन पायलट आपल्या पक्षाचा प्रचार करत असले तरी त्यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यावर टीका करणे टाळले आहे. मी माझ्या पक्षाचा प्रचार करत आहे, ते त्यांच्या पक्षाचा प्रचार करत आहेत. त्यामुळे आता लोकांना काय ते ठरवू द्या, असं पायलट म्हणाले आहेत.