मध्यरात्री ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात! 4 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी, धक्कादायक व्हिडिओ समोर

Tamil Nadu Latest News: गुरुवारी पहाटे चेन्नई-त्रिची राष्ट्रीय महामार्गावर बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
Terrible accident of travels- in-tamilnadu
Terrible accident of travels- in-tamilnaduesakal

तामिळनाडू: चेन्नई-त्रिची राष्ट्रीय महामार्गावरील मदुरंथकम येथे बसचे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर 15 हून अधिक जखमी झाले. जखमींना चेंगलपट्टू शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पडलम पोलिसांनी दिली आहे.

पदलम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (16 मे 2024) पहाटे चेन्नई-त्रिची राष्ट्रीय महामार्गावर बस ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. ओव्हरटेक करताना बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस एका लॉरीला धडकली. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Terrible accident of travels- in-tamilnadu
National Dengue Day 2024 : डेंग्यूचे डास जवळपास फिरकणार ही नाहीत, फक्त तुमच्या दिनचर्येत करा 'हे' बदल

बुधवारी झालेल्या दोन अपघातात 9 जणांना जीव गमावला -

याआधी काल (बुधवार) तामिळनाडूमध्ये दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात सुमारे 9 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. बुधवारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, कल्पक्कममध्ये गुरे वाचवण्याच्या प्रयत्नात कारचे नियंत्रण सुटले आणि ती झाडावर आदळली. या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या ५ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे पाच तरुण पुद्दुचेरीहून परतत होते. दुसऱ्या अपघातात चेन्नईतील मधुरमगाम येथे कार आणि ट्रकची धडक झाली. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.

Terrible accident of travels- in-tamilnadu
Salman Khan house firing case: सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या मृत्यूचा कोर्टाने मागवला अहवाल; पोलीस कोठडीत संपवलं होतं जीवन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com