टेरर फंडिंगचे ‘यूपी’तही धागेदोरे

पीटीआय
सोमवार, 26 मार्च 2018

लखनौ - उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दहशतवाद्यांना आर्थिक मदत (टेरर फंडिंग) केल्याच्या आरोपाखाली दहा लोकांना अटक केली. या  लोकांचे लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

गोरखपूर, लखनौ, प्रतापगड आणि मध्य प्रदेशातील रिवानमधून दहा लोकांना काल एटीएसने अटक केली. पाकिस्तानमधून येणाऱ्या सूचनांनुसार दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्यामध्ये या लोकांचा सहभाग असल्याचे एटीएसचे महानिरीक्षक असीम अरुण यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.  

नसीम अहमद, नईम अर्शद, संजय सरोज, नीरज मिश्रा, साहिल मसी, उमा प्रताप सिंह, मुकेश प्रसाद, निखिल राय ऊर्फ मुशर्रफ अन्सारी, अंकुर राय आणि दयानंद यादव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

काही लोकांना आपण नेमके काय करत आहोत, हे चांगले माहीत होते, तर काही जण हा एक लॉटरी गैरव्यवहार असल्याचा विचार करत असत, अशी माहिती देऊन अरुण यांनी सविस्तर तपास सुरू असून, आणखी काही जणांना अटक केली जाण्याची शक्‍यता असल्याचे सांगितले. बॅंकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही भूमिका तपासली जाणार आहे. 

अटक केलेल्या लोकांकडून एटीएम कार्ड, ४२ लाख रुपयांची रोख रक्कम, स्वॅप मशिन्स, मॅग्नेटिक कार्ड रिडर्स, तीन लॅपटॉप, विविध बॅंकांचे पासबुक, देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

सात चकमकींत तीन गुंड ठार
उत्तर प्रदेशमध्ये गुंडांचा बीमोड करण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने मोहीम उघडली असून, गेल्या चोवीस तासांत चार जिल्ह्यांत सात ठिकाणी झालेल्या चकमकींत तीन कुख्यात गुंड ठार झाले, तर सहा जणांना पकडण्यात आले. यादरम्यान सहा पोलिस कर्मचारी जखमी झाले. या चकमकी सहारणपूर, गाझियाबाद, गौतम बुद्धनगर, मुझफ्फरनगर जिल्ह्यांत झाल्या आहेत.

अशी होती कार्यपद्धती...
लष्करे तैयबाचा एक सदस्य या लोकांशी कायम संपर्क साधत असे आणि त्यांना बनावट नावाने बॅंक खाते उघडण्यास तसेच कोणत्या खात्यात किती पैसे जमा करावेत याबाबतचे निर्देश देत असे. भारतीय एजंट यासाठी १० ते २० टक्के कमिशन घेत असे. एक कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेचे व्यवहार केले जात होते, असे एटीएसचे महानिरीक्षक असीम अरुण यांनी सांगितले. 

Web Title: Terror funding UP ATS lucknow news