काश्मीर: सर्जिकल स्ट्राईकमुळे दहशतवाद घटला

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 एप्रिल 2017

गेल्या सहा महिन्यांत काश्मीर खोऱ्यात 2325 दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षभरात सीमेवरून 371 घुसखोरीच्या घटना घडल्या आहेत. तसेच घुसखोरीकरून भारतीय हद्दीत आलेल्या 35 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे आणि तिघांना अटक करण्यात आलेली आहे.

नवी दिल्ली - गेल्यावर्षी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये 25 टक्के घट झाल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी सांगितले.

लोकसभेत बोलताना गृह राज्यमंत्री हंसराज अहिर म्हणाले, की 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2016 या काळात जम्मू काश्मीरमध्ये 193 दहशतवादी कारवाया झाल्या होत्या. त्यावेळी झालेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर 1 ऑक्टोबर ते 31 मार्च या काळात 155 दहशतवादी कारवाया झाल्या आहेत. या कारवायांमध्ये सुमारे 25 टक्के घट झाली आहे. 29 सप्टेंबर भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केले होते. या स्ट्राईकनंतर जम्मू काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनाही खूप कमी झाल्या आहेत.

गेल्या सहा महिन्यांत काश्मीर खोऱ्यात 2325 दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षभरात सीमेवरून 371 घुसखोरीच्या घटना घडल्या आहेत. तसेच घुसखोरीकरून भारतीय हद्दीत आलेल्या 35 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे आणि तिघांना अटक करण्यात आलेली आहे.

Web Title: Terror incidents down by 25 per cent after surgical strikes