esakal | दहशतवाद्यांनी रणनिती बदलली, काश्मीरमध्ये 'हे' नागरिक रडारवर : JK पोलिस
sakal

बोलून बातमी शोधा

Terrorist

गेल्या वर्षभरात दहशतवादी हल्ल्यांमध्ये ठार झालेल्या २८ नागरिकांपैकी पाच व्यक्ती ही शिख समुदायाची होती, तर २ व्यक्त बाहेरच्या राज्यातील हिंदू मजूर होते.

'दहशतवाद्यांनी रणनिती बदलली, काश्मीरमध्ये 'हे' नागरिक रडारवर'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरात काश्मीरमध्ये २८ नागरिकांचा दहशतवादी (kashmir terrorist attack) हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी काश्मीरला लक्ष्य केलं असून गेल्या आठवड्यापासून सात नागरिकांचा बळी गेला आहे. या २८ नागरिकांपैकी पाच व्यक्ती ही शिख समुदायाची होती, तर २ व्यक्त बाहेरच्या राज्यातील हिंदू मजूर होते. तसेच गुरुवारी देखील दहशतवाद्यांनी ईदगाह परिसरात शाळेवर गोळीबार केला. यामध्ये एक शिख सुमदायाच्या मुख्याध्यापिका आणि एक काश्मीरी पंडीत शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. सध्या दहशतवादी अल्पसंख्याक समुदायातील (minority community) नागरिकांना लक्ष्य करत आहेत. याबाबत काश्मीरचे पोलिस अधिकारी विजय कुमार यांनी माहिती दिली आहे.

हेही वाचा: जम्मू-काश्मीर | अनंतनागमधील अमरनाथ गुहा मंदिरावर बर्फवृष्टी

''मारले गेलेले दहशतवादी, विशेषत: त्यांचे नेतृत्व, त्यांच्या सहाय्यक संरचनांचा नाश आणि कायदा व सुव्यवस्थेची सतत आणि प्रभावी अंमलबजावणी यामुळे दहशतवाद्यांमध्ये निराशा आहे. त्यामधूनच हे हल्ले झाले आहेत. दहशतवाद्यांनी त्यांची रणनिती बदलली असून त्यांनी निःशस्त्र महिला, पोलिस, नागरिक आणि अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे'', असे कुमार यांनी हिंदूस्थान टाईम्ससोबत बोलताना सांगितले.

''अशा सर्व घटनांमध्ये दहशतवादी पिस्तूल वापरत असून नव्याने भरती झालेले दहशतवादी किंवा सध्या दहशतवाद्यांमध्ये सामील होण्याच्या मार्गावर असलेल्या आरोपींचा या घटनांमध्ये समावेश आहे. काही घटनांमध्ये स्थानिक कामगारांचा देखील समावेश असल्याचे आढळून आले आहे. दहशतवाद्यांच्या कारवायांवर पोलिसांची करडी नजर असून दहशतवाद्यांचा शोध घेत आहोत. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन कुमार यांनी दिले. काश्मीरमधील अल्पसंख्याक नागरिकांनी घाबरू जाऊ नये. त्यांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही पूर्ण सज्ज आहोत'', असेही कुमार म्हणाले.

ईदगाह परिसरात नेमकं काय घडलं?-

दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील इदगाह परिसरातील शाळेवर गुरुवारी गोळीबार केला. यावेळी शिक्षकांना ओळखपत्राची मागणी करण्यात आली. मात्र, त्यांना विरोध केला असता गोळ्या झाडून ठार केले. यामध्ये ठार झालेल्या मुख्याध्यापिकेचं नाव सतिंदर कौर असून शिक्षकाचे नाव दीपक चांद असं आहे.

loading image
go to top