दहशतवादाचा मार्ग सोडून लष्करात आलेल्या जवानाला 'अशोकचक्र'

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 जानेवारी 2019

नवी दिल्ली : काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या लान्सनायक नजीर वाणी या जवानाच्या नावाची घोषणा 'अशोकचक्र'साठी करण्यात आली आहे. लष्कराच्या सेवेत येण्यापूर्वी नजीर वाणी यांचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता. मात्र, लष्करात आल्यानंतर त्यांनी देशसेवा केली. त्यांच्या या कार्याचा गौरव 'अशोक चक्र' देऊन केला जाणार आहे. 

लान्सनायक नजीर वाणी लष्करातील 34 राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. मागील वर्षी शोपियाँ जिल्ह्यात लष्कराने केलेल्या कारवाईत त्यांनी 6 दहशतवाद्यांना ठार केले होते. या ऑपरेशनदरम्यान ते हुतात्मा झाले होते. दहशतवाद्यांविरोधात त्यांनी केलेल्या कारवाईची दखल घेत त्यांना यापूर्वी दोनदा लष्कराकडून सन्मान करण्यात आले असून, लष्कराचे पदकही मिळाले आहे. नजीर यांचे कुटुंब काश्मीर खोऱ्याच्या कुलगाम जिल्ह्यातील चेकी अश्मुजी गावात राहत आहे. त्यांच्यामागे त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. 

दरम्यान, भारत सरकारकडून लष्करातील जवानांना त्यांच्या वीरतेसाठी शौर्य चक्र, कीर्ती चक्र आणि अशोक चक्र देऊन सन्मान केला जातो. यामध्ये अशोक चक्र हा लष्करातील सर्वोच्च असा पुरस्कार समजला जातो.

Web Title: Terrorist Turned Soldier Nazir Wani who Martyred Last Year. To get Highest Gallentary Award Ashok Chakra