
Assam Terrorist Attack On Security Force
ESakal
शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) सकाळी आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील काकोपाथर भागात अज्ञात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या छावणीवर हल्ला केला. त्यांनी केलेल्या गोळीबारात तीन लष्करी जवान जखमी झाले. सुदैवाने त्यापैकी कोणीही गंभीर जखमी झाले नाही. या हल्ल्यात मोठे नुकसान झाले नाही. मात्र या घटनेने खळबळ उडाली आहे.