esakal | स्मृती इराणींची अमेठीसाठी मोठी घोषणा; 'मी तर अमेठीची बहीण'

बोलून बातमी शोधा

textile minister smriti irani will shift amethi uttar pradesh

स्मृती इराणी यांनी आज, आपण अमेठीमध्ये वास्तव्यास जाणार असल्याची घोषणा केलीय.

स्मृती इराणींची अमेठीसाठी मोठी घोषणा; 'मी तर अमेठीची बहीण'
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

अमेठी (उत्तर प्रदेश) : काँग्रेसचे तात्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांचा त्यांच्याच पारंपरिक लोकसभा मतदारसंघात पराभव करून भाजप नेत्या स्मृती इराणी चर्चेत आल्या. केंद्रात त्यांची मंत्रिपदी वर्णीही लागली. मंत्रिपदामुळं त्या मतदारसंघाकडं दुर्लक्ष करतील, अशी शक्यता व्यक्त होत होती. पण, स्मृती इराणी यांनी अमेठीसाठी मोठी घोषणा केलीय. आता स्मृती इराणी अमेठीतच रहायला जाणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्मृती इराणी यांनी आज, आपण अमेठीमध्ये वास्तव्यास जाणार असल्याची घोषणा केलीय. मतदारसंघातील लोकांशी संवाद साधता यावा, त्यांचे प्रश्न समजून घेता यावेत, यासाठी इराणी यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अमेठीमध्ये घर बांधण्यात येत आहे. स्मृती इराणी पूर्वी मुंबईत राहत होत्या. टीव्ही सिरिअल्समध्ये कारकिर्द गाजवलेल्या स्मृती इराणी यांनी 2014मध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. गेल्या काही वर्षांपासून स्मृती इराणी दिल्लीत वास्तव्यास आहेत. अमेठीत रहायला जाण्याविषयी स्मृती इराणी म्हणाल्या, '2019च्या निवडणुकीत मी मिळवलेला विजय हा माझा नाही तर लोकांचा आहे. मी फक्त एक सिम्बॉल होते. 2019 हा लोकांच्या विजयाचा पुरावा आहे. या विजायामुळं मी अमेठीची बहीण झाले. अमेठीचे खूप हाल झाले आहेत. अमेठीने व्हीआयपी संस्कृती अनुभवली आहे.' अमेठीत दहा हजार कोटी रुपयांचा एक प्रकल्प यापूर्वी सुरू करण्यात आलाय. त्यामुळं स्थानिकांना रोजगार मिळेल, असं स्मृती इराणी म्हणाल्या.

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

मी मुंबईतलं घर कधीच सोडलंय. आता दिल्ली आणि अमेठी हेच माझं घर. सध्या अमेठीमध्ये माझ्या घराचे बांधकाम सुरू झाले आहे. लवकरच ते पूण होईल आणि मी अमेठीत रहायला जाईल. 
- स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री आणि खासदार, अमेठी