

Vijay 15-Year-Old Anna Hazare Protest Video Goes Viral Amid Tamil Nadu Power Battle
esakal
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि तामिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे संस्थापक विजय जोसेफ यांचा १५ वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नुकत्याच झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवून त्यांच्या पक्षाने राज्याच्या राजकारणात नवी उलथापालथ घडवली आहे. मात्र, या यशानंतरही सरकार स्थापनेची प्रक्रिया अद्याप रखडली आहे.