Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Tamil Nadu CM Thalapathy Vijay Scraps 46 Temple Fund Projects Worth ₹245.85 Crore : डीएमके काळातील ४६ प्रकल्पांना ब्रेक; धार्मिक निधीचा व्यावसायिक वापर थांबवून मंदिर दुरुस्ती, सेवा व कल्याण योजनांना प्राधान्य
Thalapathy Vijay Cancels Temple Fund Projects Worth ₹245.85 Crore

Thalapathy Vijay Cancels Temple Fund Projects Worth ₹245.85 Crore

Esakal

Updated on

तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपथी विजय यांनी सत्तेवर आल्यानंतर मागील डीएमके सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या २४५.८५ कोटी रुपयांच्या ४६ प्रकल्पांची प्रशासकीय मंजुरी रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हिंदू धार्मिक आणि धर्मादाय विभाग अंतर्गत मंजूर झालेल्या या प्रकल्पांमध्ये विवाह सभागृहे आणि व्यावसायिक संकुलांचा समावेश होता. मंदिरांच्या निधीचा वापर व्यावसायिक उद्देशांसाठी न करता मंदिरांशी संबंधित कामांसाठीच व्हावा, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकल्पांमधून वाचलेला निधी मंदिरे आणि भाविकांसाठी नव्या योजनांवर खर्च करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com