भाजपच्या आमदाराला बलात्कारापेक्षा 'नमस्कार' महत्त्वाचा!

वृत्तसंस्था
शनिवार, 30 जून 2018

मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडल्यानंतर पिडीतेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी रुग्णालयात भारतीय जनता पक्षाचे खासदार सुधीर गुप्ता आले असता, त्यावेळी तिथे उपस्थित असलेले त्यांच्याच पक्षाचे आमदार सुदर्शन गुप्ता यांनी पिडितेच्या कुटुंबियांना खासदारांना धन्यवाद म्हणायला सांगितले, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. त्यांना बलात्कारापेक्षा 'नमस्कार' महत्त्वाचा वाटत आहे. साहेब आपल्याला भेटायला आले आहेत, त्यांना तुम्ही धन्यवाद म्हणा असे त्यांनी कुटुंबियांना आवाहन केले होते.​

मंदसौर - मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडल्यानंतर पिडीतेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी रुग्णालयात भारतीय जनता पक्षाचे खासदार सुधीर गुप्ता आले असता, त्यावेळी तिथे उपस्थित असलेले त्यांच्याच पक्षाचे आमदार सुदर्शन गुप्ता यांनी पिडितेच्या कुटुंबियांना खासदारांना धन्यवाद म्हणायला सांगितले, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. त्यांना बलात्कारापेक्षा 'नमस्कार' महत्त्वाचा वाटत आहे. साहेब आपल्याला भेटायला आले आहेत, त्यांना तुम्ही धन्यवाद म्हणा असे त्यांनी कुटुंबियांना आवाहन केले होते.

मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये 7 वर्षांच्या लहान मुलीबर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पूर्वनियोजित असल्याचे पोलिस तपासात म्हटले आहे. शाळेत जाणाऱ्या लहान मुलींवर नजर ठेऊन हे कृत्य करण्यात आले आहे. अत्याचार करण्यासाठी जाणीवपूर्वक 7 वर्षांच्या मुलीला लक्ष्य करण्यात आले कारण तिला विरोध करता येऊ नये असे पोलिस तपासात म्हटले आहे. 

दरम्यान, या घटनेने पुर्ण देशाला हादरवून टाकले असून, दोषींना फाशी देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, चौकशीदरम्यान, आरोपी इरफानने (20) त्याच्यासोबत, मंदसौरमध्ये राहणारा आसिफही असल्याचे कबूल केले आहे. पिडित मुलगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्या मुलींवर अत्याचार केल्यानंतर आरोपी मद्यसेवन करत होते, तर मुलीच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता, असे पोलिसांनी सांगितले आहे. 

आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचे आश्वासन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले आहे. 'अशा प्रकारचे लोक पृथ्वीवर ओझे आहेत त्यांनी जगण्याचा अधिकार नाही, लवकरात लवकर कारवाई करून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात येईल,' असे त्यांनी स्पष्ट केले.

आरोपी इरफान आणि आसिफ आपला जास्तीत जास्त वेळ मद्यसेवन करण्यात घालवत असत, स्थानिक महिलांना छेडछाड करण्याचे प्रकारही त्यांनी यापूर्वी केले होते. परंतु, त्यांनी यावेळी लहान मुलीला आपली शिकार बनवले. कारण, तिने विरोध करु नये, त्यांची योजना यशस्वी व्हावी या उद्देशाने त्यांनी या कामासाठी लहान मुलीची निवड केली, असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी सांगितले की, 'संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पिडित मुलीवर नजर ठेऊन तिला चॉकलेटचे लालच देऊन स्वतःसोबत घेऊन गेले, आणि नंतर एका अज्ञातस्थळी हे दुष्कृत्य केले.

Web Title: Thank MP for visiting you MLA to Mandsaur rape survivor parents