ट्विटरवर का होताहेत #ThanksMughals आणि #RapistMughals हे हॅशटॅग ट्रेंड?

टीम ईसकाळ
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

सध्या ट्विटरवर #ThanksMughals आणि #RapistMughals हे दोन हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. हे दोन ट्रेंड्स का सुरू झाले हे जाणून घेऊ...

काल 'तानाजी : द अनसंग वॉरियर'चा ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटात मर्दमावळा तानाजी यांनी मावळ्यांसह कोंढाणा कसा जिंकला हे दाखविण्यात आले आहे. मुघलांच्या मोठ्या सैन्याचा सामना करत शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी कसा यशस्वी लढा दिला हे दखविण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या ट्विटरवर #ThanksMughals आणि #RapistMughals हे दोन हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. हे दोन ट्रेंड्स का सुरू झाले हे जाणून घेऊ...

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

Tanhaji : 'तानाजी'च्या या 10 डायलॉग्जने लावलंय सगळ्यांना वेड!

ट्विटरवर मुघलांचे धन्यवाद मानणारे आणि मुघलांना आरोपी ठरविणारे दोन वेगळ्या विचारांचे लोक हे हा हॅशटॅग वापरून ट्विट करत आहेत. यापैकी एका विचाराच्या युझर्सचे म्हणणे आहे की, मुघल भारतात आल्याने भारताच्या सौंदर्यात भर पडली, अनेक प्राचीन प्रेक्षणीयस्थळे मुघलांनी तयार केली, त्यामुळे भारतीय संस्कृतीत भर पडली. असे म्हणणारे युझर्स #ThanksMughals हा हॅशटॅग वापरत आहेत. तर, दुसरीकडे मुघलांनी भारतात येऊन अनेक गोष्टी उध्वस्त केल्या, स्त्रीयांवर अत्याचार केला व भारतीयांना गुलामीची वागणूक दिली, म्हणून मुघलांना आरोपी म्हणणारे युझर्स #RapistMughals हा हॅशटॅग वापरत आहेत. 

 

 

 

Tanhaji Trailer : 'हर मराठा पागल है... स्वराज्य का, शिवाजीराजे का!'; तानाजीचा तुफान ट्रेलर रिलीज

ताजमहाल, अखंड भारत, लालकिल्ला, बिर्याणी अशा अनेक गोष्टींचे श्रेय नेटीझन्स मुघलांना देत आहेत. तर गड-किल्ल्यांची, मंदिरांची पडझड केल्याने, मूर्त्यांची विटंबना केल्याने, तसेत महिलांवर अत्याचार केल्याने मुघलांना अत्याचार करणारे मुघल म्हटले जात आहे. त्यामुळे #ThanksMughals आणि #RapistMughals या हॅशटॅगमध्ये ट्विटरवॉर सुरू आहे.

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ThanksMughals and RapistMughals hashtag trending twitter