Tanhaji Trailer : 'हर मराठा पागल है... स्वराज्य का, शिवाजीराजे का!'; तानाजीचा तुफान ट्रेलर रिलीज

टीम ईसकाळ
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

'तानाजी' चित्रपटाचे आतापार्यंत रिलीज झालेले पोस्टर, प्रोमोच इतके भारावून टाकणारे आहेत, की त्याचा ट्रेलर कसा असेल याकडेल सर्वांचे लक्ष लागले होते. आज (ता.19) अखेर हा ट्रेलर रिलीज झाला आणि अल्पावधीतच या ट्रेलरने लोकांना वेड लावले आहे. 

'गड आला, पण सिंह गेला' असे वर्णन ज्या मर्द मावळ्याचे केले जाते त्या नरवीर तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाचा इतिहास 'तानाजी : द अनसंग वॉरियर'मधून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'तानाजी' चित्रपटाचे आतापार्यंत रिलीज झालेले पोस्टर, प्रोमोच इतके भारावून टाकणारे आहेत, की त्याचा ट्रेलर कसा असेल याकडेल सर्वांचे लक्ष लागले होते. आज (ता.19) अखेर हा ट्रेलर रिलीज झाला आणि अल्पावधीतच या ट्रेलरने लोकांना वेड लावले आहे. ट्विटरवर #TanhajiTrailer हा हॅशटॅग लगेच ट्रेंड झाला आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

Tanhaji : 'मैं आपको हारने नहीं दूंगी'; काजोल दिसणार मराठमोळ्या रूपात

'तानाजी : द अनसंग वॉरियर'मध्ये अजय देवगण नरवीर तानाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे. तानाजीचा शौर्य, पराक्रम आणि कोंढाणा जिंकण्याची जिद्द ट्रेलरमध्ये दिसून येते. उदयभानूशी निधड्या छातीने लढणाऱ्या, शिवाजी महाराजांची आज्ञा पाळणाऱ्या आणि पत्नी-मुलावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तानाजींचे बलाढ्य रूप मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सैफ अली खानने साकारलेला उदयभानू दमदार आहे.  

Tanhaji Promo : 'एक तरफ मुघलों की आँधी, दुसरी तरफ मुठ्ठीभर मराठा'

तानाजीमध्ये काजोलही एक महत्त्वाची भूमिका साकारतीय. ती नक्की या चित्रपटात काम करणार की नाही, यावर चर्चा सुरू असतानाच या पोस्टरमुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काजोल तानाजी मालुसरेंच्या पत्नीची म्हणजेच सावित्रीबाई मालुसरेंची भूमिका साकारत आहे. आजपर्यंत फक्त तानाजींच्याच पराक्रमाबाबत इतिहासात नोंद होती, मात्र सावित्रीबाई त्यांच्या पाठिशी कशा भक्कमपणे उभ्या राहिल्या हे 'तानाजी'मध्ये बघायला मिळेल. तसेच अजय-काजोल हे रिअल लाईफ कपल आता मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा झळकणार आहे. 

Tanhaji : 'पत्थर से ठोकर तो सब खाते हैं, पत्थर को ठोकर मारे वो मराठा!'; पोस्टर रिलीज

काजोलने यापूर्वी तानाजी, शिवाजी महाराज, जिजाबाई, औरंगजेब, उदयभानू यांचे पोस्टर रिलीज केले होते. सैफ अली खान उदयभानूच्या भूमिकेत दिसेल. मराठमोळा ओम राऊत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे, तर संगीतकार अजय-अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. येत्या वर्षात 10 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित हेईल.   

Tanhaji Poster : 'स्वराज्य से बढकर क्या?'; तानाजी सज्ज!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindi movie Tanhaji trailer released today