
Thar Accident Horrific Crash 5 Killed One Critical Video Surfaces Online
Esakal
हरियाणातील गुरुग्राम इथं थारचा भीषण अपघात झालाय. भरधाव वेगात थार दुभाजकाला धडकल्यानंतर उलटली. या अपघातात थारमधील पाच जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये ३ तरुणी आणि २ तरुणांचा समावेश आहे. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याला रुग्णालयात दाखल केलं असून उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.