
Viral Video: एका थार चालकाने स्कुटीला धडक दिली. त्यानंतर काही सेकंदांनी पुन्हा त्याच स्कुटीला रिव्हर्स घेत चिरडण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे दोनदा धडक दिल्यानंतर खाली उतरून धमकी देण्याचाही प्रयत्न करण्यात आला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. जम्मूतील ग्रीन बेल्ट पार्क परिसरात ही घटना घडलीय.