...म्हणून पत्रकार परिषदेची वेळ बदलली : निवडणूक आयुक्त

Thats why the time of press conference has changed says Election Commissioner O P Rawat
Thats why the time of press conference has changed says Election Commissioner O P Rawat

नवी दिल्ली : राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा या राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत जाहीर केले. तेलंगणातील निवडणुकीचे वेळापत्रकामुळे पत्रकार परिषदेसाठी उशीर झाल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडून देण्यात आले. 

निवडणूक आयोगाची नियोजित पत्रकार परिषद साडेबारा वाजता होणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अजमेर येथे होणाऱ्या सभेसाठी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेची वेळ बदलली असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यानंतर आता निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद दुपारी तीन वाजता घेण्यात आली. मोदींच्या सभेनंतर ही पत्रकार परिषद घेण्यात आल्याने राजकीय स्तरावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, या पत्रकार परिषदेपूर्वी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, की या तीन तथ्यांमधून एक निष्कर्ष काढा, एक म्हणजे निवडणूक आयोग 5 राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्य़ासाठी साडेबारा वाजता पत्रकार परिषद बोलविली होती. मोदी दुपारी एक वाजता अजमेरला सभा घेणार आहेत आणि निवडणूक आयोग आता तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे एकच प्रश्न उरतो की निवडणूक आयोग स्वतंत्र आहे का? मोदींच्या सभेसाठी निवडणूक आयोगाने वेळ बदल्याचा आरोप केला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com