esakal | ब्रिटिशकालीन भुयार पुढील वर्षी खुले होणार
sakal

बोलून बातमी शोधा

underground road

ब्रिटिशकालीन भुयार पुढील वर्षी खुले होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेच्या इमारतीत सापडलेले ब्रिटिशकालीन भुयार विविध विकास कामामुळे बुजलेले असले तरी पुढील वर्षापर्यंत भुयारातील ‘फांसी की खोली’ इतिहासप्रेमींसाठी खुली करता येईल, असे विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: राजस्थान पंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसची हवा; भाजप पिछाडीवर

दिल्ली विधानसभा इमारतीतून निघणाऱ्या भुयारी मार्गाचे तोंड नुकतेच सापडले आहे. दिल्ली विधानसभा इमारत ते लाल किल्ला यादरम्यान असलेले भुयाराचे अंतर ६ ते आठ किलोमीटर इतके आहे. विकासकामांमुळे विशेषत: मेट्रो उभारणी आणि सांडपाणी यामुळे भुयाराचे काही मार्ग बंद झाले आहेत.

परंतु या भुयारातील ‘फांसी की खोली’ पर्यंत जाता येऊ शकते आणि त्याच्या दुरुस्तीसाठी तसेच पुनर्बांधणीसाठी दिल्ली सरकारने निविदाही काढली आहे. पुढील स्वातंत्र्यदिनापर्यंत इतिहासप्रेमींनाही ठराविक काळासाठी भुयार खुले केले जाईल, असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: आसामच्या अखंडतेसाठी अखेर 'कार्बी आंगलॉंग करारा'वर स्वाक्षऱ्या

यासाठी विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी पुढाकार घेतला आहे. ते म्हणाले, १९९३ रोजी आमदार झाल्यानंतर विधानसभेच्या इमारतीतून ब्रिटिशकालीन भुयार लाल किल्ल्यापर्यंत जात असल्याचे ऐकले.

त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याबाबत ठोस माहिती मिळू शकली नाही. आता भुयाराचे तोंड सापडले आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्ष झालेले असताना ‘फांसी की खोली’ खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. या खोलीचे स्वातंत्र्यसैनिकांचे मंदिर म्हणून रूपांतरित करू इच्छित आहोत.

loading image
go to top