मशिद रंगवल्यानंतर कॉंग्रेसचं कार्यालय गुलाबी, वाराणसीत चर्चांना उधाण

मशिदीनंतर आता कॉंग्रेसचे कार्यालय गुलाबी! वाराणसीत खळबळ
मशिदीनंतर आता कॉंग्रेसचे कार्यालय गुलाबी! वाराणसीत खळबळ
मशिदीनंतर आता कॉंग्रेसचे कार्यालय गुलाबी! वाराणसीत खळबळesakal
Updated on
Summary

विनापरवानगी रंगरंगोटी करण्यात आल्याने कॉंग्रेसने तीव्र आक्षेप नोंदवत प्रशासनाला 36 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.

वाराणसीतील (Varanasi) काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या (Kashi Vishwanath Corridor) रस्त्यावर असलेल्या मशिदीला झालेल्या रंगरंगोटीचा (Painting) वाद मिटतो न मिटतो तोच एक नवीन प्रकरण समोर आले आहे. शहरात एकरूपता दाखवण्याच्या उद्देशाने वाराणसी विकास प्राधिकरणाने (Varanasi Development Authority) आता कॉंग्रेस (Congress) कार्यालयाला रंगरंगोटी केली आहे. विनापरवानगी असे करण्यात आल्याने कॉंग्रेसने तीव्र आक्षेप नोंदवत प्रशासनाला 36 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. याआधी सोमवारी रात्री बुलनाला येथील मशिदीलाही रंगरंगोटी करण्यात आली होती. मात्र, वाद वाढत गेल्याने पुन्हा मशिदीला पांढरे करण्यात आले. (The controversy escalated when the Congress party office in Varanasi was painted pink)

मशिदीनंतर आता कॉंग्रेसचे कार्यालय गुलाबी! वाराणसीत खळबळ
दिल्ली न्यायालय : कुतूबमिनार परिसरात देवतांच्या पूजेला परवानगी नाही

यूपी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अशोक कुमार सिंग (Ashok Kumar Singh) यांनी प्राधिकरणाला पत्र लिहून परवानगीशिवाय हे होत असल्याबद्दल तीव्र आक्षेप व्यक्त केला असून, कार्यालयाला पुन्हा पूर्वीच्या रंगात रंगवण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, वाराणसीतील मैदागिन चौकाजवळील कॉंग्रेस कार्यालयाला गुलाबी रंग देण्याआधी प्रशासनाने पक्षाच्या नेत्यांची कोणतीही परवानगी घेतली नाही. स्थानिक पक्ष कार्यालयाला संमतीशिवाय रंगरंगोटी करण्यात आली, हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. यावर पक्ष गप्प बसणार नाही. वाराणसी विकास प्राधिकरणाला 36 तासांत पक्ष कार्यालय पूर्ववत करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. प्रशासनाने तातडीने तसे न केल्यास पक्ष कायदेशीर कारवाई करेल, असा इशारा त्यांनी पत्रात दिला आहे. 12 आणि 13 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर, वाराणसी विकास प्राधिकरण श्री काशी विश्वनाथ मंदिराकडे (Shri Kashi Vishwanath Temple) जाणाऱ्या रस्त्यावरील इमारतींना गुलाबी रंगात रंगवून शहरात एकरूपता दाखवत आहे.

मशिदीनंतर आता कॉंग्रेसचे कार्यालय गुलाबी! वाराणसीत खळबळ
रिलायन्स Jio चे सर्वांत स्वस्त प्लॅन्स! कमी किमतीत बंपर डेटा

दोन दिवसांपूर्वी मशिदीला रंगरंगोटी करण्यावरून झाला होता वाद

दोन दिवसांपूर्वी बुलनाला येथील मशिदीलाही गुलाबी रंग देण्यात आला होता. मात्र, मुस्लिम समाजाच्या आक्षेपानंतर प्रशासनाने पुन्हा मशीद पांढऱ्या रंगाने रंगवले. वाराणसीमध्ये बनवण्यात येत असलेल्या पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्‍ट काशी विश्वनाथ कॉरिडॉरपर्यंत जाण्यासाठी गंगा नदीशिवाय रस्ते मार्गाने दोन मार्ग आहेत. एक वाट गोदौलियाहून मंदिराकडे जाते आणि दुसरी मैदागीनहून मंदिराकडे जाते. दोन्ही रस्त्यांवर येणारी सर्व घरे एकाच रंगात रंगविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यानंतर सर्व घरांना गुलाबी रंग देण्यात आला. वाटेत मैदागीन येथे कॉंग्रेसचे कार्यालय आहे. त्यालाही रंगरंगोटी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com