चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाचे पुन्हा थैमान! मॉल, रहिवासी इमारती होताहेत सील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाचे पुन्हा थैमान! मॉल, रहिवासी इमारती होताहेत सील
चीनमध्ये कोरोनाचे पुन्हा थैमान! मॉल, रहिवासी इमारती होताहेत सील

चीनमध्ये कोरोनाचे पुन्हा थैमान! मॉल, रहिवासी इमारती होताहेत सील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीजिंगमध्ये (Beijing) कोविड-19 ने (Covid-19) पुन्हा एकदा दार ठोठावले आहे. चीनच्या (China) राजधानीच्या मध्यवर्ती जिल्ह्यांमध्ये कोविडचा पुन्हा प्रसार झाला आहे, जिथे अधिकाऱ्यांनी एक मॉल सील केला आहे आणि अनेक निवासी संकुले बंद करण्यात आली आहेत. त्याचवेळी ईशान्य चीनच्या डालियानमध्ये कोविडची 52 नवीन प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामुळे चीनची झोप उडाली आहे.

हेही वाचा: जलद लसीकरणासाठी 'ही' कृती करा! महाराष्ट्राचा केंद्राला सल्ला

चीनने मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन, कोविडच्या चाचण्या आणि प्रवासाला निर्बंध लादून कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखला आहे, परंतु गेल्या महिन्यात देशांतर्गत प्रवासामुळे झालेल्या संसर्गामुळे अधिकारी हाय अलर्टवर आहेत. गुरुवारी सकाळी बीजिंगच्या चाओयांग आणि हैदियानमध्ये सहा नवीन रुग्ण आढळले आहेत. स्थानिक मीडियाने वृत्त दिले आहे की, ही नवीन प्रकरणे ईशान्य जिलिन प्रांतात नुकतीच संक्रमित झालेल्या लोकांच्या जवळची आहेत.

मॉल्स बंद, मोठ्या प्रमाणावर चाचण्या

बीजिंग यूथ डेलीच्या वृत्तानुसार, बुधवारी डोंगचेंगमधील रॅफल्स सिटी मॉल सील करण्यात आला, कारण कोविडची लागण झालेल्या एका व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तीने त्या मॉलमध्ये गेला होता. यानंतर कर्मचारी आणि ग्राहकांची चाचणी होईपर्यंत त्यांना मॉल सोडण्याची परवानगी नव्हती. गुरुवारीही मॉल बंदच होते.

बीजिंगमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत कोरोनाचा ताजा संसर्ग समोर आला. बीजिंगच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले, की कोरोना रुग्णांच्या संपर्कातील 280 हून अधिक व्यक्तींची ओळख पटली आहे. चाओयांग आणि हैदियान जिल्ह्यात सुमारे 12 हजार लोकांची चाचणी घेण्यात आली आहे. गुरुवारी पहाटे, पाच निवासी समुदाय, एक प्राथमिक शाळा आणि दोन कार्यालये संकुल स्नॅप लॉकडाउन अंतर्गत ठेवण्यात आले होते. हजारो रहिवाशांना बाहेर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात चाचण्या घेण्यात आल्या. तपासात असे आढळून आले, की संक्रमित प्रकरणांपैकी चार एकाच घरातील सदस्य आहेत, तर उर्वरित दोन जिलिनचे रहिवासी आहेत आणि ते बीजिंगच्या व्यवसायाच्या सहलीवर आले होते आणि त्यांच्याशी जवळच्या व्यक्ती संपर्कात होत्या.

चीनमध्ये कोरोनाच्या पुन्हा प्रसारासाठी डालियान बंदर जबाबदार

गुरुवारी ईशान्य चीनच्या लिओनिंग प्रांतात कोविडचे नवीन रुग्ण आढळले आणि 5 सायलेंट कॅरिअर आढळले. हे सर्व डालियान या किनारपट्टीच्या पर्यटन शहरामध्ये सापडले. येथे झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे शाळा आणि महाविद्यालये आधीच बंद करण्यात आली आहेत. आतापर्यंत 80 घरगुती संसर्गाच्या प्रकरणांसह आणि 17 परदेशी प्रकरणांसह 97 लक्षणे नसलेल्या रुग्णांवर डालियानमधील प्रमुख रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. डालियान हे कोल्ड-चेन जलीय उत्पादनांच्या आयातीचे सर्वात मोठे बंदर आहे आणि चीनमधील एक महत्त्वाचे कोल्ड-चेन स्टोअरेज आणि वाहतूक तळ आहे. आयात केलेल्या कोल्ड-चेनमधील सुमारे 70 टक्के माल डालियान बंदरातून चीनमध्ये प्रवेश करतात. चीनमधील निम्म्याहून अधिक कोविड प्रकरणांसाठी डालियान बंदर जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: मारुती चितमपल्ली म्हणाले, हंस हा दूध व पाणी वेगळे करत नाही, तर...

अनेक देशांनी कोरोना विषाणूशी संबंधित निर्बंध उठवले असल्याने चीन अजूनही आपल्या झीरो-कोविड धोरणाला चिकटून आहे. या अंतर्गत चीनने महामारीच्या सुरुवातीपासूनच आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा मोठ्या प्रमाणात बंद केल्या आहेत. संक्रमणाच्या नवीन लाटेमुळे लाखो लोक लॉकडाउनमध्ये आहेत, देशांतर्गत प्रवासाचे नियम कडक करण्यात आले आहेत, तर अनेक विमान उड्डाणे आणि गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

loading image
go to top