निवडणूक सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर; का होतोय विरोध? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Loksabha
निवडणूक सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर; का होतोय विरोध?

निवडणूक सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर; का होतोय विरोध?

नवी दिल्ली : निवडणूक सुधारणा विधेयक सोमवारी लोकसभेमध्ये (Loksabha) मोठ्या गोंधळात मंजूर झालं. याला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला. मात्र, तृणमूल काँग्रेसनं (TMC) पाठिंबा दर्शवला. या विधेयकामुळं निवडणूक प्रक्रियेत सकारात्मक बदल घडून येईल असं सांगितलं जातंय तर विरोधकांनी मात्र हा प्रकार नागरिकत्वाशी संबंधीत होऊ शकत नाही, असं म्हटलंय. (The Election Laws Amendment Bill 2021 Passed in Lok Sabha)

हेही वाचा: 32 नंबरवरुन खडाजंगी; पंकजांच्या टीकेवर धनजंय मुंडेंचा पलटवार

काय आहे या विधेयकाचा उद्देश?

The Election Laws (Amendment) Bill, 2021 अर्थात निवडणूक सुधारणा विधेयक २०२१ मध्ये मतदान कार्ड (Election Card) आधार कार्डशी (Aadhar) जोडण्यात येणार आहे. यामुळं मतदान यादीतील दुबार नावं आणि बोगस मतदान रोखण्यासाठी याचा फायदा होणार आहे. याच कारणामुळं विरोधीपक्षांपैकी एक असलेल्या तृणमूल काँग्रेसनं या विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे.

काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचा विरोध

पण काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी मात्र या विधेयकाला संसदेत विरोध केला आहे. विरोध करताना कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार शशी थरुर म्हणाले, "आधार क्रमांक हा केवळ रहिवासी पुरावा म्हणून वापरलं जातं. हा क्रमांक नागरिकत्वाचा पुरावा नाही. पण तरीही तुम्ही जर मतदारांकडे आधार क्रमांक मागणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला केवळ रहिवासी असल्याचा कागदोपत्री पुरावा मिळेल नागरिकत्वाचा पुरावा मिळणार नाही. यामुळं नागरिक नसलेल्या व्यक्तीलाही मत देण्याचा धोका आहे"

Web Title: The Election Laws Amendment Bill 2021 Passed In Lok Sabha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :loksabhaDesh news
go to top