32 नंबरवरुन खडाजंगी; पंकजांच्या टीकेवर धनजंय मुंडेंचा पलटवार

एकमेकांची औकात काढत प्रचारसभांमध्ये झाले आरोप-प्रत्यारोप
Dhananjay Munde
Dhananjay Munde

बीड : मुंडे भाऊ-बहिणीमध्ये पुन्हा एकदा जोरदार खडागंजी पहायला मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी (Local Body Elections) बीडमध्ये सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. यादरम्यान, सोमवारी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर सडकून टीका केली. ३२ नंबरवरुन त्यांच्यामध्ये चांगलीच खडागंजी झाली. यावेळी त्यांनी एकमेकांची औकातही काढली. (Dhananjay Munde Latest Speech)

Dhananjay Munde
पंकजा मुंडेंची अतिवृष्टीच्या मदतीवरुन धनंजय मुंडेंवर टीका, म्हणाल्या..

धनंजय मुंडे म्हणाले, "एखाद्या गावाचा पालकमंत्री आणि मंत्रीमंडळाचा मंत्री म्हणून मी पन्नास किंवा शंभर कोटींची घोषणा करत असेल आणि जर माझ्या या शब्दाला मी जागत असू पण तरीही तुम्ही आमच्यावर टीका करताना यांची देण्याची औकात आहे का? असा सवाल करता. पण तुम्ही तर पाच वर्षे राज्यात, केंद्रात सत्तेत होता. इथला आमदार भाजपचा होता, तुम्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री होता. इथं एक नाहीतर दोन आमदार झाले. पण तरीसुद्धा तुम्हाला विकासासाठी पैसे देण्याची औकात दाखवता आली नाही. राहिला माझ्या औकातीचा प्रश्न. मी २०१९च्या निवडणुकीत महिला बाल कल्याण मंत्री, ग्रामविकास मंत्री, जलसंधारण मंत्री या तीन-चार मंत्र्यांचा एकदाच ३२ हजार मतांनी पराभव केला ना? ही आमची औकात आहे" (Beed Latest news in Marathi)

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

वडवणी येथील सभेत धनंजय मुंडेंवर टीका करताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, "पालकमंत्री बीड जिल्ह्यातील प्रचारात शंभर कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करतात. जिल्ह्यातल्या पाच नगर पंचायतींना पाचशे कोटी देणार होतात तर दोन वर्षे काय टाळ कुटतं बसला होतात का? आमचं सरकार होतं तेव्हा मी पहिल्या चार मंत्र्यांमध्ये होते, ३२ व्या क्रमांकाची मंत्री नव्हते" (Pankaja Munde latest news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com