गव्हर्नर एक बोलतात, अर्थमंत्री एक बोलतात; महागाईवरून पी.चिदंबरम यांचा हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

P Chidambaram

गव्हर्नर एक बोलतात, अर्थमंत्री एक बोलतात; महागाईवरून पी.चिदंबरम यांचा हल्लाबोल

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा हवाला देत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर महागाईवरुन आरोप केला आहे. पी चिदंबरम यांनी ट्विट केले की, "RBI गव्हर्नर म्हणाले की देशात महागाई अस्वीकार्यपणे जास्त आहे. अर्थमंत्री म्हणाले की, महागाई ही जगभरातील घटना असून सरकार त्यावर नियंत्रण ठेवत आहे."

पी चिदंबरम यांनी आणखी एका ट्विटमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अॅनिमियाबाबत संसदेत केलेल्या वक्तव्यावरही निशाणा साधला होता. याबाबत त्यांनी ट्विट केले होते, "आरोग्यमंत्र्यांनी संसदेत सांगितले की, गेल्या पाच वर्षांत सहा महिने ते पाच वर्षे वयोगटातील मुलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण ५८.६ टक्क्यांवरून ६७.१ टक्क्यांवर पोहोचले आहे. अशक्तपणाचे कारण एकच आहे - अपुरे अन्न आणि अर्थमंत्री म्हणतात महागाईमुळे लोकांचे हाल होत नाहीत! लोकांना - विशेषत: लहान मुलांना जास्त किमतीमुळे अन्न कमी मिळत आहे."

हेही वाचा: महागाईच्या झळा, शिवभोजनाच्या थाळीत भाजीऐवजी टोमॅटो चटणी

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले होते की,2022-23 या आर्थिक वर्षात चलनवाढीचा दर 6.7 टक्‍क्‍यांवर कायम असला तरी अनिश्चितता कायम आहे. त्यांनी आर्थिक वर्ष 23 च्या दुसऱ्या तिमाहीत महागाई 7.1 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली होती.

वाढत्या महागाईमुळे काँग्रेस आक्रमक

महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेस मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहे. महागाईविरोधात काँग्रेसने शुक्रवारी जोरदार आंदोलन केले. आंदोलनामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सुमारे सहा तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. त्याचबरोबर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला. प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनीही महागाईसह इतर मुद्द्यांवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता.

हेही वाचा: महागाईवरून काँग्रेसचा हल्लाबोल

Web Title: The Governor Speaks One The Finance Minister Speaks One P Chidambarams Attack On Inflation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..