esakal | आज भारत सरकार मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी ओळखलं जातं - सचिन पायलट
sakal

बोलून बातमी शोधा

Mandate of Peoples Against the BJP says Congress Leader Sachin Pilot

आज भारत सरकार मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी ओळखलं जातं - सचिन पायलट

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारवर (narendra modi govt) जोरदार हल्लाबोल केला आहे. लसीकरण कार्यक्रमावरुन त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. "आज भारत सरकार मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी ओळखले जाते. माझ्या आठवणीनुसार, देशात पोलियो निर्मूलनाची मोहिम यशस्वीपणे राबवण्यात आली. अनेक दशकं ही मोहिम सुरु होती. पण त्यावेळी पंतप्रधान आणि अन्य नेत्यांना स्वत:चे मार्केटिंग करताना तसेच लोकांना उपकृत केल्याची भावना पाहिली नाही" अशा शब्दात सचिन पायलट यांनी मोदी सरकारवर टीका केली.

"सध्या सुरु असलेला कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम वादग्रस्त आहे. केंद्र, राज्य आणि रुग्णालयांना वेगवेगळ्या दरांना लसी विकल्या जात आहेत. सरळ सरळ यात काळा बाजार होतोय. दबाव टाकल्यानंतर ते मोफत लस द्यायला तयार झाले, पण आता मार्केटिंग आणि ब्रँडिंग सुरु आहे" अशी टीका सचिन पायलट यांनी केली.

हेही वाचा: काश्मीरचे फुटीरतावादी नेते गिलानींचं निधन, पाकिस्तानात दुखवटा

सचिन पायलट यांनी केंद्राच्या नॅशनल मॉनेटायझेशन पाइपलाइन योजनेवरही टीका केली. "एनएमपीमधून पुढच्या चार वर्षात ६ लाख कोटीचा महसूल मिळणार असल्याचं केंद्र सरकार सांगत आहे. करदात्याच्या मेहनतीच्या पैशातून मागच्या सहा दशकात बांधण्यात आलेल्या रस्ते, महामार्ग आणि रेल्वेमधुन १.५० लाख कोटी मिळतील" असं अर्थमंत्र्यांचं म्हणणं आहे. "भारत सरकार यातून जो पैसा उभारणार आहे, त्यातून आजची ५.५० लाखाची तूट भरुन निघणार आहे का? किंवा महसूल वाढीला चालना मिळणारय का?" असा सवाल सचिन पायलट यांनी विचारलाय.

loading image
go to top