esakal | काश्मीरचे फुटीरतावादी नेते गिलानींचं निधन, पाकिस्तानात दुखवटा
sakal

बोलून बातमी शोधा

sayyed ali shah geelani

काश्मीरचे फुटीरतावादी नेते गिलानींचं निधन, पाकिस्तानात दुखवटा

sakal_logo
By
दीनानाथ परब

श्रीनगर: हुरियत कॉन्फरन्सचे (hurriyat conference) संस्थापक आणि काश्मीरचे फुटीरतवादी नेते सय्यद अली शाह गिलानी (Syed Ali Shah Geelani) यांचे बुधवारी रात्री हैदरपोरा निवासस्थानी १०.३५ च्या सुमारास निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थाच्या (Health issue) कारणांमुळे मागच्या काही वर्षांपासून ते फार सक्रीय नव्हते. श्रीनगर (srinagar) हैदरपोरामध्येच त्यांचा दफनविधी करण्याची कुटुंबाची इच्छा आहे. सय्यद अली शाह गिलानी यांच्या पश्चात त्यांना तीन मुले आहेत. यात दोन मुलं आणि एक मुलगी आहे.

गिलानी यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काश्मीर खोऱ्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. काश्मीर रेंजचे आयजीपी विजय कुमार यांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: प्रार्थना स्थळे खुली होतील, पण स्मशानभुमी बंदीचे काय?

कोण होते सय्यद अली शाह गिलानी?

२९ सप्टेंबर १९२९ रोजी सय्यद अली शाह गिलानी यांचा जन्म झाला. ते काश्मीरचे फुटीरतवादी नेते म्हणून ओळखले जातात. ते सर्वात आधी जमात-इ-इस्लामी काश्मीरचे सदस्य होते. त्यानंतर त्यांनी तेहरीक-ए-हुरियतची स्थापना केली आहे. काश्मीरमधील फुटीरतवादी गट या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते. फुटीरतावादी सर्व पक्षांचा समावेश असलेल्या हुरियत कॉन्फरन्सचे ते अध्यक्ष होते. जून २०२० मध्ये त्यांनी हुरियतचे अध्यक्षपद सोडले. १९७२, १९७७ आणि १९८७ मध्ये ते जम्मू-काश्मीरच्या सोपोर विधानसभा मतदारसंघातून आमदार होते.

हेही वाचा: प्रसंगी राज्यात पुन्हा लॉकडाऊन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

इम्रान खान यांनी शोक संदेशात काय म्हटलय...

काश्मिरीचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनाचं वृत्त ऐकून खूप दु:ख झालं. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर लोकांसाठी संघर्ष केला. गिलानींना तुरुंगवास, त्रास सहन करावा लागला, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटलं आहे. सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनाबद्दल पाकिस्तानचा झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. आजचा दिवस पाकिस्तानात दुखवटा पाळण्यात येईल, असे इम्रान खान यांनी जाहीर केलं आहे.

loading image
go to top