esakal | कसली गोडयं! फ्लाईटमध्ये झाली बापलेकीची भेट, पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

कसली गोडयं! फ्लाईटमध्ये झाली बापलेकीची भेट, पाहा व्हिडिओ

कसली गोडयं! फ्लाईटमध्ये झाली बापलेकीची भेट, पाहा व्हिडिओ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

फ्लाईटमधील एका चिमुकलीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्याच फ्लाईटमध्ये जेव्हा या चिमुकलीला तिचे पायलट वडील दिसतात तेव्हा ती खूप खूश होते. तिच्या चेहऱ्यावरील दिसणारे भाव इतके निरागस आहेत की सर्वजण पाहात राहतात.

या चिमुकलीचे नाव शनाया मोतीहार (Shanaya Motihar) असून तिच्या इन्स्टाग्राम अकांऊटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांनी लाईक, कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे

व्हि़डिओमध्ये ही चिमुकली फ्लाईटमध्ये एका सीटवर उभी आहे. त्याच फ्लाईटमध्ये पायलटच्या ड्रेसमध्ये असलेल्या वडिलांना ती ओळखते. फ्लाईटमध्ये वडिलांना पाहुन शनायाने खूर गोड रिअॅक्शन दिली आहे. शनायाला तिच्या वडिलांना पाहून इतका आनंद होतो की ती त्यांना 'पापा', 'पापा' अशी हाक मारते आणि ''हाय' करते. बाप-लेकीच्या या गोड भेटीचा व्हिडिओ शनायाच्या आईने शुट केला आहे.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ''पप्पांसोबत ही माझी पहिली फ्लाईट.. त्यांनी विमानातून मला दिल्ली नेले. मी खूप एक्साईटेड आहे. ही माझी आतापर्यंतची सगळ्यात बेस्ट फ्लाईट आहे. लव्ह यू पापा.' आतापर्यंत ८ लांखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून हजारो लोकांनी कमेंटस केल्या आहेत.''

हेही वाचा: पर्यावरणासाठी जगतवारी करणारा 'सायकलबाबा' आहे तरी कोण?

हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून चिमुकल्या शनायाची रिअक्शनने नेटकऱ्यांना अक्षरश: वेड लावेल आहे. तिच्या चेहऱ्यावरच हास्य आणि आनंद पाहून एका युजरने कमेंट केली आहे की, मी हा व्हिडिओ लूपमध्ये( वारंवार) पाहत आहे.

loading image
go to top