
Strange Names for Liquor: सरकारी विभागांकडून भाषांतरात झालेल्या चुकांच्या कहाण्या अनेकदा समोर येत असतात, मात्र पश्चिम बंगालच्या उत्पादन शुल्क विभागाने अर्थाचा अनर्थ करून टाकला. येथील दारू व्यावसायिकांनी विभागाशी करार केला आहे. या करार पत्राचे इंग्रजीतून बंगालीमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. त्यात अशा अनेक चुका झाल्या आहेत, ज्यामुळे अर्थाच अनर्थ झाला आहे.
'विदेशी मद्य आणि देशाचा आत्मा'-
अनुवादित प्रतीमध्ये 'कंट्री स्पिरिट'ला (Country Spirit) 'देशाचा आत्मा' असे वर्णन केले आहे. एवढेच नाही तर '100 रुपए में एग्जीक्यूटेड' देण्याऐवजी '100 रुपयांना फाशी' असे लिहिले आहे. राज्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या स्टेट वेबरेज कॉर्पोरेशनने दारू व्यावसायिकांशी करार केला आहे. महामंडळाच्या सूचनेवरून स्टॅम्प पेपरवर व्यापाऱ्यांसोबत करारनामा करण्यात आला. मात्र, कराराच्या इंग्रजी ते बंगाली भाषांतरात त्रुटी आढळून आल्या. 'एग्रीमेट विद दी रिटेलर ऑफ कंट्री स्पिरिट एंड फॉरेन लिकर' असे लिहिले आहे. मद्यविक्रीच्या किरकोळ विक्रेत्यांशी करार आणि देशाचा आत्मा असे भाषांतरात लिहिले आहे. (The new name of liquor - 'Spirit of the country', 'hanging for 100 rupees'!)
हा तर बंगालीचा अपमान-
करारनाम्याचे पत्र पाहून मद्यविक्रेते अस्वस्थ झाले आहेत. या संदर्भात कंट्री स्पिरिट अँड ऑन शॉप अँड हॉटेल असोसिएशनचे सरचिटणीस गौतम मुखर्जी यांनी सांगितले की, बंगाली भाषांतर पाहून आम्ही सर्वजण हैराण आणि अस्वस्थ झालो आहोत. भाषांतरात अनेक चुका आहेत. हा बंगाली भाषेचा थेट अपमान आहे. कंट्री स्पिरिटऐवजी देशी दारू लिहिता आले असते, असे ते म्हणाले. याबाबत उत्पादन शुल्क विभागाकडून कोणतेही निवेदन आलेले नाही. मात्र, सॉफ्टवेअर वापरून केलेल्या भाषांतराचा हा परिणाम असावा, असे एका प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले. भाषांतरानंतर भाषा तज्ञाकडून त्याची खातरजमा करायला हवी होती.
मुख्यमंत्र्यांच्या 'खेळा होबे'ची धूम-
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या 'खेला होबे' (Khela Hobe) या पुस्तकाची कोलकाता बुक फेअरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. शहरातील सेंट्रल पार्कमध्ये हा ग्रंथोत्सव सुरू आहे. यात मुख्यमंत्र्यांची 12 पुस्तके आहेत, मात्र 'खेळा होबे'ची सर्वाधिक विक्री होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खेलो होबेच्या आतापर्यंत 400 प्रती विकल्या गेल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.