रशियन सैन्याविरुद्ध अखेरच्या श्वासापर्यंत लढला अभिनेता; शेवटची पोस्ट व्हायरल

Russia Ukraine War: रशियन आक्रमणापासून आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी सशस्त्र दलात सामील झालेला युक्रेनियन अभिनेता पाशा ली (actor Pasha Lee) गोळीबारात ठार झाला.
Ukrainian Actor Pasha Lee Died in war
Ukrainian Actor Pasha Lee Died in warSakal

Russia Ukraine War: गेल्या काही दिवसांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु आहे. रशियाच्या युक्रेनियन सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून सामान्य नागरिक तगड्या सैन्याचा मुकाबला करत आहेत. युक्रेनमधील सेलिब्रिटीही यामध्ये मागे नाहीत. रशियन आक्रमणापासून आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी सशस्त्र दलात सामील झालेला युक्रेनियन अभिनेता पाशा ली (Actor Pasha Lee) वयाच्या ३३ व्या वर्षी इरपिन येथे गोळीबारात ठार झाला. मृत्यूपूर्वी इंस्टाग्रामवर त्याची शेवटची पोस्ट व्हायरल होत आहे. (Ukrainian actor Pasha Lee's last post before death while fighting against Russia)

Ukrainian Actor Pasha Lee Died in war
Russia Ukraine: युद्धग्रस्त सुमीमधून ‘ग्रीन कॉरिडॉर’

आपल्या शेवटच्या इंस्टाग्राम (Instagram) पोस्टमध्ये अभिनेता पाशा ली याने म्हटले होतं की, "गेल्या ४८ तासांत खाली बसण्याची आणि आमच्यावर कसा बॉम्बफेक होत आहे याचा फोटो घेण्याची संधी मिळाली. आम्ही हसत आहोत कारण आम्ही सर्व नीट हाताळू"

Ukrainian Actor Pasha Lee Died in war
Russia-Ukraine War Live: कीव्हच्या वायव्य भागातील लढाई जोरात सुरु

गेल्या महिन्यात, रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर, क्रिमियामध्ये जन्मलेला अभिनेता पाशा ली रशियन सैन्याविरुद्ध लढण्यासाठी देशाच्या संरक्षण दलात सामील झाला होता. युक्रेनच्या नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टचे अध्यक्ष सेर्गी टोमिलेंको आणि ओडेसा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल यांनी त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला पुष्टी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com