पीएम नॅशनल डायलिसिस प्रोग्राम अंतर्गत 12 लाख गरीबांना मदत: मोदी

पीएम नॅशनल डायलिसिस प्रोग्रामने (PM National Dialysis Program) 12 लाख गरीबांना मोफत डायलिसिसची मदत केली आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
PM National Dialysis Program
PM National Dialysis ProgramEsakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोलकाता येथील चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या (Chittaranjan National Cancer Institute) दुसऱ्या कॅम्पसचे उद्घाटन केले. चित्तरंजन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उद्घाटन समारंभाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीही हजेरी लावली.

या उद्घाटनप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताच्या एकूण पात्र लोकसंख्येपैकी, 90% पेक्षा जास्त लोकसंख्येला किमान एक डोस मिळाला आहे. अवघ्या 5 दिवसांच्या कालावधीत 15-17 वयोगटातील (15-17 Age Group) सुमारे 1.5 कोटी (1.5 crore) मुलांना डोस देण्यात आल्याचंही पंतप्रधान मोदींनी सांगितले.

PM National Dialysis Program
PM मोदी पुलावर अडकल्यानंतर नड्डांची काँग्रेसवर आगपाखड

सरकारने गुडघा प्रत्यारोपणाच्या खर्चातही कपात केली आहे आणि याचा ज्येष्ठ नागरिकांना फायदा होत आहे. पीएम नॅशनल डायलिसिस प्रोग्रामने (PM National Dialysis Program)12 लाख गरीबांना मोफत डायलिसिसची मदत केली आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com