कोरोना विषाणूच्या उगमाचे अमेरिकेकडून राजकारण; चीनची टीका

Corona virus spreads in major numbers at China
Corona virus spreads in major numbers at China
Updated on

बीजिंग : जगभरात अजूनही कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आलेला नाहीये. कोरोना विषाणूचा संसर्ग सध्या थोडा कमी झाला असला तरीही त्याची दहशत अद्यापही कायम आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची सुरुवात चीनमधून झाली असली तरीही त्याचा नेमका उगम कुठून झाला, याबाबतची स्पष्टता अद्याप नाहीये. हा विषाणू चीनमध्येच उगम पावला की तो दुसरीकडे उगम पावून नंतर चीनमध्ये आला, याबाबत मतमतांतरे आहेत. याचाच नेमका शोध घेण्यासाठी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी अभ्यास सुरु केला होता.

Corona virus spreads in major numbers at China
हरयाणात आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज; शरद पवार म्हणतात...

कोरोना विषाणूची निर्मिती नेमकी कशी झाली हे शोधण्यास अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांना अपयश आल्यानंतर चीन आंतरराष्ट्रीय चौकशी अडथळा आणत आहे व माहिती देण्यास नकार देत आहे, असा आरोप अमेरिकेने केला. हे आरोप म्हणजे ‘या विनाशक विषाणूच्या उगमाचा मुद्याला बगल देण्याचा व त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न असल्याची टीका चीनने शनिवारी केली.

Corona virus spreads in major numbers at China
नूतनीकरणानंतर 'जालियनवाला बाग स्मारक' पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण

अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी तयार केलेला हा अहवाल शास्त्रीयदृष्ट्या विश्‍वासार्ह नाही. या प्रकरणात अमेरिकेला अपेक्षित असलेले उत्तर या संस्था देऊ शकलेल्या नाहीत. कोराना विषाणूचा उगम शोधण्यासाठी सुरू असलेले सर्व प्रयत्न वाया गेले आहेत. विषाणूचा उत्पत्ती शोध हा विज्ञानाशी संबंधित आहे. त्यामुळे ही बाब गुप्तचर तज्ज्ञांच्या नाहीतर शास्त्रज्ञांच्या अखत्यारितील आहे, असे उत्तर अमेरिकेतील चीनी दूतावासाने दिले असल्याचा दावा चीनच्या अधिकृत वृत्तसंस्थेने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why did India waive cotton import duty?
Latest Marathi News Live Update
IMD monsoon delay forecast for India 2026
Mamata Banerjee reaction on Abhishek Banerjee attack
Marathi News Esakal
www.esakal.com