ED Officer Arrested: ईडीचा अधिकारीच निघाला भ्रष्टाचारी; 15 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक

ED Officer Arrested
ED Officer Arrested

जयपूर- राजस्थान अँटी करप्शन युनिटने गुरुवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) एका अधिकाऱ्याला लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. ईडीचे अधिकारी नव किशोर मीना यांना १५ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. अधिकाऱ्यासोबत त्याचा सहकारी बाबुलाल मीना याला देखील मध्यस्थी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. एएनआयने यासंदर्भातील बातमी दिली आहे. (The Rajasthan anti corruption unit ACB arrested an Enforcement Directorate ED official Naval Kishore Meena taking bribe)

मिळालेल्या माहितीनुसार, नवल किसोर मीना आणि बाबुलाल मीन यांना मणिपूरमधील चीट फंड प्रकरणी लाच घेतल्याचा आरोपाप्रकरणी अटक झाली आहे. अँटी करप्शन युनिटच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरण मागे घेणे, अटक न करणे आणि संपत्तीवर जप्ती न आणण्यासाठी अधिकाऱ्याने लाच घेतली आहे. त्यानंतर मिळालेल्या तक्रारीनुसार त्यांनी ही कारवाई केली आहे.

दाव्यानुसार, अधिकाऱ्याने १७ लाखांची लाच मागितली होती. त्यानंतर १५ लाखांवर डील झाली होती. राजस्थान एसीबीने याप्रकरणी अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. नवल किशोर मीना याच्या उत्पन्न स्रोताबाबत एसीबीला शंका होती. त्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली आहे.

ED Officer Arrested
Rajasthan Election : राजस्थान विधानसभेत काँग्रेस बाजी मारणार? पक्षाचा मास्टर प्लॅन आला समोर

दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. सध्या अनेक नेत्यांवर कारवाईसाठी ईडी चर्चेत आहे. ईडी विशेष करुन विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करत असल्याचा नेहमी आरोप होत असतो. त्यामुळे ईडीचा अधिकाराचा भ्रष्टाचारामध्ये हात रंगला असल्याचं समोर आल्याने नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com